मुंबई : बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदे यांचा पोलिसांनी केलेला एन्काऊंटर म्हणजे, दाल मे कुछ काला था, त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथे [ ता. 25 जाने 2025 ] केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात आ. आव्हाड यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवून, खळबळजनक आरोप केला आहे. बीडचे सरपंच स्व. संतोष देशमुख, परभणीचे दिवंगत कार्यकर्ते सूर्यवंशी यांना न्याय देण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केला होता. एक पोलीस अधिकारी जखमी झाला होता. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला गोळी लागल्यानंतर पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये त्याच्यावर गोळीबार केला होता. त्यात अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितले.
अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काऊंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. घटना ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
एसआयटीकडून त्याची चौकशी सुरू होती. त्याला कोठडीही देण्यात आली होती. त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होते. मात्र, आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस तळोजा येथे आले होते. सकाळी 5.30 वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते. अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नव्हता. या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला होता.
अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला होता. त्याने तीन राऊंड फायर केलं. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याने पोलिसांच्या पायांवर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेले. बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदे यांचा पोलिसांनी केलेला एन्काऊंटर म्हणजे, दाल मे कुछ काला था, त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथे [ ता. 25 जाने 2025 ] केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकार या आरोपाला काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.