मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडीतील खासदार कंगना रणाैत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. कंगना रनाैत हिने नुकतीच हिमाचल प्रदेशातील महिलांची तुलना बाॅलीवूड अभिनेत्रींसाेबत केली आहे. कंगनाने हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या किंवा वाढलेल्या प्रीती झिंटा आणि यामी गाैतमसारख्या अभिनेत्रींचे फाेटाे शेअर केले आहेत आणि लिहिले आहे की आमच्यापेक्षा चांगल्या दिसणा-या स्त्रिया आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गुरे, शेळ्या-मेंढ्या आणि पशुपालन करत आहेत.
कंगनाने स्वत:च्या तसेच प्रीती झिंटा, यामी गाैतम आणि लापता लेडीज फेम अभिनेत्री प्रतिभा रंता यांच्या छायाचित्रांचा काेलाज शेअर केला आहे. यासाेबत तिने लिहिले आहे की, हिमाचल प्रदेशचे लाेक. जेव्हा मी हिमाचलला जाते आणि शेतात अथक काम करणाèया आमच्या बराेबरीच्या किंवा त्याहून अधिक सुंदर स्त्रिया पाहते, तेव्हा तेथे काेणताही इन्स्टा किंवा रील नाही, त्या शेळ्या-मेंढ्या पाळतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. या महिला नक्कीच प्रसिद्ध हाेऊ शकतात, असे मला वाटते.
हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्याचे एका सर्वेक्षण अहवालात समाेर आल्याने कंगना रणाैतची ही पाेस्ट समाेर आली आहे.
कंगना रणाैतचा माेस्ट अवेटेड चित्रपट इमर्जन्सी 17 जानेवारी 2025 राेजी रिलीज हाेणार आहे.
हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित हाेणार हाेता, परंतु सेन्साॅर बाेर्डाने चित्रपट मंजूर करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी काही वादग्रस्त दृश्ये काढून टाकण्याची आणि बदलण्याची मागणी केली हाेती, परंतु कंगना ते न काढता रिलीज करण्यावर अडून हाेती. कंगना सेन्साॅर बाेर्डाविराेधात काेर्टात पाेहाेचली हाेती. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता कंगनाला काही बदलांसह प्रमाणपत्र मिळाले आहे.
या चित्रपटात कंगना रनाैतसाेबत अनुपम खेर, महिमा चाैधरी, श्रेयस तळपदे हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.






