बीड – गेवराई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गेवराई तहसील कार्यालयाच्या वतीने साप्ताहिक बीड राज्यकर्ताचे युवा संपादक अमोल वैद्य यांचा आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल संपादक अमोल वैद्य यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
गेवराई तहसील कार्यालयाच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधवांचा विधानसभा निवडणूक काळातील प्रशंसनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी साप्ताहिक बीड राज्यकर्ताचे युवा संपादक अमोल वैद्य यांच्या कार्याची दखल घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, तहसीलदार संदीप खोमणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, नायब तहसीलदार संजय सोनवणे, नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. संपादक अमोल वैद्य हे पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही सदैव अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल अमोल वैद्य यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.