भगवानगड – धर्म सत्ता आणि संस्था सर्वात मोठी मानली जाते. त्यामुळे, भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एखाद्या संस्थेच्या धर्मपीठाने एखादे वक्तव्य करून, आपली भूमिका जाहीर करण्याची पद्धती आहे. त्या भूमिकेला भाविकांकडून होकार देऊन, धर्मपीठाचा मान सन्मान राखला जातो. याच अर्थाने, गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना. धनंजय मुंडे यांना भगवान गडाचा सर्वोच्च आधार मिळाला आहे. भगवान गडाचे महंत, मठाधिपती, न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य करून, त्यांना नैतिक पाठिंबा जाहीर केला आहे. बीड जिल्ह्य़ातील मसाजोग ता. केज येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्री क्षेत्र भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भगवानगड भक्कमपणाने धनंजय यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. धनंजय, हा काही खंडणी वर जगणारा नेता नाही. अशी थेट आणि स्पष्ट भूमिका घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या हात्येमागे वाल्मिक कराड आणि त्यांची गँग असल्याचे समोर आले आहे. कराड यांच्यासह इतरांना अटक झाली आहे. एक जण फरार आहे. दरम्यान या प्रकरणात गेल्या काही दिवसापासून राज्याचे मंत्री ना. धनंजय मुंडे यांना महायुती आणि महाविकास आघाडी मधील काही आमदारांनी टार्गेट करून, कराड व त्याच्या साथीदारांना धनंजय मुंडेचा यांचा आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. थेट शरद पवार यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्या पासून अनेक आमदार, खासदारांनी ना. मुंडे यांना टारगेट केले आहे. मुंडे यांचा अद्याप राजीनामा घेण्यात आलेला नाही. देशमुख हत्या प्रकरणात फडणवीस, पवार, शिंदे सरकार ॲक्शन मोडवर आहे. मात्र, धनंजय मुंडे यांना अभय दिले जात आहे. मुंडे यांनी ही, आपण देशमुख हत्या प्रकरणात दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा होऊ द्या, मी तयार आहे. अशी भूमिका त्यांनी जाहीर करून, दोषींना फासावर लटकवा, अशी मागणी केली आहे. विरोधी पक्ष मुंडे यांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच, पालकमंत्री पदावर हक्क असून ही, ना. मुंडे यांना पक्षाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोक भावनेचा आदर केला. बीडच्या पालकमंत्री पदावर उपमुख्यमंत्री अजित दादा यांना पाठविण्यात आलेले आहे. धनंजय मुंडे यांना काही अंतरावर ठेवून, पक्ष त्यांची बाजू घेत असल्याचे चित्र असताना, महाराष्ट्राचे अराध्यदैवत असलेले तीर्थक्षेत्र श्री. भगवान बाबा गडाने ना. मुंडे यांची बाजू घेतल्याने, धर्मपीठाचा सर्वोच्च आधार आणि भक्कम पाठिंबा जाहीर झाल्याने, मुंडे यांना दिलासा मिळाल्याची चर्चा होऊ लागली आहे. भगवान गडाचे मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री यांना रोखठोक व्यक्तिमत्त्वाचे मठाधिपती म्हणून ओळखले जाते. 30 जानेवारी 2025 रोजी ना. मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन बाबांचे दर्शन घेतले. मठाधिपती डॉक्टर शास्त्री यांच्याशी चर्चा करून आशीर्वाद घेतले. विशेष बाब म्हणजे ना. मुंडे यांचा भगवान गडावर मुक्काम होता.