प्राचीन काळापासून सूर्यनमस्कार घालण्यात येतात. सूर्य उगवताना त्याची किरण अंगावर घेऊन सूर्यनमस्कार घातले जायचे .सूर्यनमस्काराचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो .तसेच शरीराला कोवळ्या उन्हातून ‘ड ‘जीवनसत्व मिळते. सूर्यनमस्कार हा एक प्रभावी योगाभ्यास आहे. जो शरीर आणि मन या दोन्हींचे आरोग्य सुधारतो .कमीत कमी 12 सूर्यनमस्कार रोज घातले पाहिजे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही सूर्यनमस्कार घालू शकतात. सूर्यनमस्कार लवचिकता, ताकद, यासाठी उपयुक्त आहेत. पारंपारिक सूर्यनमस्कार हे ‘हटयोग’ प्रकारात मोडतात. प्रत्येक सूर्यनमस्कार दोन सूर्यनमस्कारांचा संच असतो. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. म्हणून “सूर्यनमस्काराला व्यायामाचा राजा म्हणतात” .यामध्ये 12 विविध आसनांचा समावेश असतो 1) नमस्कार आसन:- नमस्कार असन म्हणजे प्रारंभिक स्थिती श्वास घेऊन दोन्ही हात बाजूने वर घेऊन आणि श्वास सोडताना दोन्ही तळहात छाती पुढे एकत्र आणून प्रार्थना मुद्रेमध्ये जोडले जातात.2) उर्ध्वनमस्कार आसन:- श्वास घेत दोन्ही हात वरती थोडेसे मागे घेतले जातात दंड कानाच्या जवळ चिकटलेले असतात. ह्या मुद्रेमध्ये आपले शरीर पायाच्या टाचांपासून हाताच्या बोटांपर्यंत ताणले जाते. त्यामुळे शरीर एकदम मोकळे झाल्यासारखे जाणवते.3) हस्त पादासन:- श्वास सोडत कमरेपासून पाठीचा कणा, सरळ ठेवून पुढच्या बाजूला खाली वाकले पाहिजे. गुडघे मात्र सरळच ठेवून तळहात पायाच्या घोट्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आसन पूर्ण होईपर्यंत स्थिर राहिले पाहिजे. आसनामुळे पाठ व पोटाचे स्नायू मजबूत होतात.4) अश्व संचालनासन:- श्वास घेत उजवा पाय जास्तीत जास्त मागे घेण्याचा प्रयत्न करावा, उजव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकला पाहिजे. डावा पाय दोन्ही तळ हातांच्या मधोमध ठेवून द्यावा. हे आसन स्नायू आणि मेटाबोॅलिज्म मजबूत करते, पोटाच्या अंतर्गत अवयवांना मजबूत करते.5) चतुरंग दंडासन:- श्वास घेत डावा पाय मागे घेऊन आपले पूर्ण शरीर एका सरळ रेषेत ठेवले जाते .भूमीला पायाची बोटे आणि तळवे, कोपर शरीराच्या काटकोनात असतात. या आसनात शरीराचा संपूर्ण भार हाताच्या आणि पायाच्या बोटांवर असतो. खांदे पाठ आणि पाय यांचे स्नायू मजबूत होतात. तसेच माणसाचा मेंदू आणि स्नायू यांच्यात संबंध निर्माण होण्यास मदत करते.6) अष्टांग नमस्कार:- सावकाशपणे गुडघे जमिनीवर आणत श्वास सोडून शरीर थोडे पुढे घेतले जाते. छाती व हनवटी जमिनीवर टिकवली जाते. पार्श्वभाग थोडा उंचवावा आसनाच्या नावातच अष्टंग म्हणजे आठ भाग जमिनीवर असतात दोन्ही हात दोन्ही पाय गुडघे छाती आणि हनवटी हे शरीराचे आठ भाग जमिनीला टेकलेले हवेत या आसन प्रकारामुळे शरीरावरील प्रत्येक भागावरची चरबी कमी होते.7) भुजंगासन:- अष्टांग नमस्कार नंतर हे आसन केले जाते. यामध्ये शरीर रचना सापाने काढलेल्या फणासारखी दिसते. शरीर जेवढे खेचले जाते तेवढेच खेचले पाहिजे जास्त ताण देऊ नये पोट कमी करण्यासोबतच संपूर्ण शरीराचे वजन नियंत्रित करण्याचे काम भुजंगासनामुळे होते. 8) पर्वतासन:- या आसनामध्ये इंग्रजी उलटा ‘व्ही ‘आकारासारखी शरीर रचना दिसते. पायाच्या टाचा जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पर्वतासन दिसायला साधे असून खूप फायदेशीर असते. रक्ताभिसरण क्रिया व पचन सुधारण्याचे कार्य पर्वतासनामुळे होते. 9) अश्व संचालनासन:- शरीर संतुलित करणारे आसन म्हणजे अश्व संचालनासन अश्व म्हणजे घोडा घोड्याप्रमाणे स्वारी करणे. .10) हस्त पादासन:- श्वास सोडत डावा पाय पुढे आणणे तळहात जमिनीवर टेकलेले थोडा वेळ स्थिर अवस्थेत थांबणे कुठलीही हालचाल होऊ देऊ नये. .11) उर्ध्वनमस्कार आसन:- हस्त पादासन आणि हे आसन झाल्यानंतर श्वास घेत पाठ सरळ हात वर उंच करत मागच्या बाजूला जावे.12) नमस्कार आसन:- प्रारंभिक स्थितीला परत येणे. सूर्यनमस्कार फक्त शारीरिक आरोग्यासाठी नव्हे तर आत्मिक आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील आळस निघून जातो. आणि ताजे तवाने वाटते. बारा सूर्यनमस्कार करताना वेगवेगळे मंत्रोच्चार केले तर मनाची एकाग्रता वाढते. श्वासोच्छवास सुधारतो. आपले आरोग्य चांगले राहते. स्मरणशक्ती वाढते. भारतीय तिथी माघ महिन्यातील. ‘रथसप्तमी’ या दिवशी “जागतिक सूर्यनमस्कार दिन “साजरा केला जातो जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त व रथ सप्तमीनिमित्त” 🙏🏻सर्वांना आरोग्यमय हार्दिक शुभेच्छा.
लेखिका.
श्रीम, सूर्यवंशी अर्चना मधूकर.(स.शि.)
जि.प.प्रा.शा . साक्षाळ पिंपरी.ता.जि.बीड.






