बीड – गेवराई : संस्कृती प्रतिष्ठान आयोजन सत्संग कीर्तन सोहळ्यात शनिवार रोजी कर्तृत्ववान व्यक्ती लोकमतचे तालुका प्रतिनिधी सखाराम शिंदे व मनोज शिंदे, मेघराज शिंदे यांच्या आई शकुंतला आसाराम शिंदे यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते शनिवार रोजी गेवराईत मातृपुजन सोहळा सन्मानपत्र देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
संत भगवान बाबा,संत वामनभाऊ यांच्या पुण्यस्मरणार्थ गजानन नगर गेवराई येथे सुरू असलेल्या सत्संग कीर्तन सोहळ्यात शनिवार रोजी कर्तृत्ववान व्यक्ती लोकमतचे तालुका प्रतिनिधी सखाराम शिंदे व मनोज शिंदे,मेघराज शिंदे यांच्या आई शकुंतला आसाराम शिंदे यांचा मातृपुजन सोहळा सन्मानपत्र देवुन सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे, ह.भ.प नामदेव महाराज शेकटेकर,नारायणराव मोटे, गेवराई पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर,पत्रकार बालाजी तोंडे,सुभाष सुतार,अरूण चाळक, तात्यासाहेब मेघारे, जे.डी शाह संयोजक महादेव चाटे याच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक जण उपस्थित होते.यावेळी सुर्यकला ढोबळे, मोहनाबाई गोंजारे, कौशल्याबाई लोणकर, कुसुम काळे, मिरा साखरे, पदमाबाई काटवटे, शांताबाई गिरी,कौशल्याबाई काळे, चंद्रभागा घोडके यांचा देखील सत्कार करण्यात आला.