अहंकारने बरबटलेली नेत्यांची हुकुमत आज ना उद्या मोडीत काढली जाते. मताची पेटी त्यासाठी सक्षम आहे. लोक म्हणतात, मोदीजी हुकुमशहा आहेत. परंतु , त्यांच्या कृतीतून तसे दिसत नाही. ते जेव्हा खरोखर दिसून येईल, तेव्हा त्यांना ही जावे लागेल. केजरीवाल यांचा अहंकार, हुकुमत लोकांना दिसली. त्यांची कृती, आतून एक, बाहेरून एक, म्हणजे दुटप्पी होती. त्यामुळे, दिल्लीतल्या जनतेने त्यांच्या झाडुला झाडुन बाजुला केले. भाजपाला जनतेने साथ दिली आहे. मोठी जबाबदारी आहे. वादे, वचन आहेत. त्यामुळे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष घालावे लागेल. दिल्लीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मोदी यांच्यावर आहे.
मोदी-शहा ज्यांच्या खांद्यावर दिल्लीचे ओझे टाकतील त्या मुख्यमंत्र्याला कृतीतून कार्यरत राहावे लागेल. हे मात्र खरे आहे.
अखेर सत्तावीस वर्षाच्या कालखंडानंतर दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना जबरदस्त वेलकम म्हणत “प्रवेश” देऊन, आपला चले जाव केले केले आहे. ७० जागे पैकी ४८ जागेवर भाजपाचे कमळ फुलले आहे. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीचा पराभव करण्याची परंपरा कायम ठेवून, दिल्लीतल्या जनतेने स्वतः दोनदा मुख्यमंत्री राहीलेल्या अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, भारद्वाज, सत्तर सत्येद्र जैन यांचा पराभव केला.

आपच्या महिला मुख्यमंत्री आदिशी यांचा मात्र विजय झाला. खर म्हणजे, आप पक्षाचा सुपडासाफ झाला आहे. आदर्श गांधीवादी नेते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेत, केजरीवाल यांनी न कळत स्वतःची इमेज तयार करून दिल्ली जिंकली. मात्र, सत्ता येताच अण्णा हजारे यांना काय कळतय, या आविर्भावात केजरीवाल टिमने अण्णांचा अपमान केला. दिल्लीतल्या राजकीय नेत्यांनी मराठी माणसाचा नेहमीच दुय्यम वागणूक दिल्याचा इतिहास आहे. मराठी माणसाचे मीठच आळणी आहे. सत्तेच्या धुंदीत दिल्लीश्वर आकंठ बुडालेले असतात, हा इतिहास आहे. मात्र, दिल्लीतल्या जनतेने अरविंद केजरीवाल आणि त्यांची हुकुमत असलेल्या आपचा दारूण पराभव करून, चले जाव चा जनादेश दिला. एका अर्थाने,
अण्णा हजारे यांचा अरविंद केजरीवाल यांना शाप लागला आहे. जैसी करणी वैसी भरणी, अशी मोजक्या शब्दात अण्णांची आलेली प्रतिक्रिया सगळा विषय स्पष्ट करणारी आहे.केजरीवाल यांनी सत्ता येताच रंग दाखवायला सुरुवात केली. भ्रष्टाचार करणार नाही. लोकपाल विधेयक आणून सत्तेवर अंकुश ठेवू , पाणी, वीज, शाळा, आरोग्य क्लिनीक च्या माध्यमातून सोयी उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली होती.आधी साध्या गाडीत जाणारे आणि फोजफाटा नाकारणारे केजरीवाल एकाच रात्रीत बदलले. स्वतःसाठी अलिशान बंगला उभा केला. फोजफाटा घेऊन आपण ही “त्याच” राजकारणी लोकांचे वंशज आहोत. हे दाखवून दिल्याने, दिल्लीकरांना ही याची जाणीव हळूहळू होत गेली. पाणी, लाईट, शाळा आणि वैद्यकीय क्षेत्रात आप च्या सरकारने चांगली कामे केलीत. मात्र, दुसरे कडे त्यांच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काहींना जेल झाली. स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, सत्येद्र जैन यांना जेलमध्ये जावे लागले आणि निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. केजरीवाल सरकार आणि त्यांची टिम स्वच्छ प्रतिमेची असती तर, ते सगळेच जेल मध्ये राहून ही दिल्लीकरांनी मोठ्या मताने निवडून दिले असते. दाल मे कुछ काला नही,पुरी दाल काली थी..! म्हणूनच, आपचा मानहानिकारक पराभव झाला.लोकांनी सगळे उघड्या डोळ्यानी पाहिले आणि पाहतात. नाराजी मतदानातून स्पष्ट होत असते. केजरीवाल यांच्या अहंकाराने “आप” पक्षाला पराभव पचवावा लागला आहे. त्याची विविध कारणे आहेत. त्या मध्ये, आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना, दिल्ली विधानसभेच्या निवडणुक प्रचारामध्ये मला निवडून दिले तर, मी मुख्यमंत्रीपदावर राहील. अशी घोषणा स्वतःच करून केजरीवाल यांनी वैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री आदिती यांचा अपमान केला. पक्षात आपलीच हुकुमत आहे. हे दाखवून दिले. केजरीवाल यांच्या विरोधात, पक्षीय पातळीवर नैतिक भूमिका मांडणाऱ्या नेत्यांना त्यांनी शत्रू मानले.
केजरीवाल यांच्या अहंकाराने “आप” पक्षाला पराभव पचवावा लागला आहे. त्याची विविध कारणे आहेत. त्या मध्ये, आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना, दिल्ली विधानसभेच्या निवडणुक प्रचारामध्ये मला निवडून दिले तर, मी मुख्यमंत्रीपदावर राहील. अशी घोषणा स्वतःच करून केजरीवाल यांनी वैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री आदिती यांचा अपमान केला. पक्षात आपलीच हुकुमत आहे. हे दाखवून दिले. केजरीवाल यांच्या विरोधात, पक्षीय पातळीवर नैतिक भूमिका मांडणाऱ्या नेत्यांना त्यांनी शत्रू मानले. काही खासदार, आमदार नाराज झाले, निघून गेले. हम करे सो , कायदा. पक्षावर एकहाती हुकुमशाही त्यांनी चालवली.
कवी कुमार विश्वास यांच्या सारख्या अनेक तरूण, ज्येष्ठ नेत्याला पक्ष सोडावा लागला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या विश्लेषणात राजकीय तज्ञांनी केजरीवाल यांच्या एकाधिकार शाहीवर टिका केली. जनतेने ही पूर्णत: नाकारले आहे. काँग्रेस पक्ष नेहमीप्रमाणेच शुन्यावर बाद झाला. त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट गेले. आप च्या १३ – १४ जागा काँग्रेस पक्षामुळे पडल्यात. हे जरी खरे असले तरी, त्याला तसा राजकीय अर्थ नाही. मुळ मुद्दा, आप पक्ष कमी पडला किंवा सत्तेविरुद्ध लाटेचा फटका बसला. आपल्या अपयशाचे खापर अन्य कुणावर फोडता येत नाही. राजकारणात भला पणा कधीही महत्त्वाचा असतो. फार धूर्तपणा माणसाला खड्यात घेऊन जातो. राजकारणातले मलाच कळते आणि मीच तेवढा लायक आहे. हे लोकांना पटत नाही. महाराष्ट्रात लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनापासून प्रेम केले. म्हणून, ते पून्हा मुख्यमंत्रीपदावर आले. हे वास्तव अधोरेखित केल्यास, दिल्लीत केजरीवाल यांचा झालेला पराभव हा आदर्श नेते अण्णा हजारे यांच्या आश्रूंचा तळतळाट आहे.
सुभाष सुतार, पत्रकार-बीड