बीड : 01 ते 08 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या आंतरराष्ट्रीय नाटय महोत्सवात रशिया, श्रीलंका, हैदराबाद, दिल्ली सहित मराठवाड्यातील कलाकारांचा सहभाग असलेले बागबान थिएटर ग्रूपचे “ययाति” हे नाटक दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी बंगळूरू येथे कलाग्राम सभागृहात कर्नाटक येथील अनेक दिग्गज रंगकर्मींच्या उपस्थितीत सादर झाले असुन त्या बद्दल मराठवाडा व महाराष्ट्रातून “बागबान थिएटर ग्रुप” वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रख्यात रंगकर्मी गिरीश कर्नाड यांचे प्रसिद्ध नाटक ‘ययाति’ या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नाट्यशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक असलम युनूस यांनी केले असून दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी या नाटकात “ययाति ” ही मध्यवर्ती भूमिका देखील साकारली आहे.
सातत्य आणि सांघिक अविष्कारामुळे हे शक्य झाले असल्याचे मार्गदर्शक साहेबराव पाटील व डॉ. गजानन दांडगे यांनी सांगितले.
राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्लीच्या गेल्या 25 वर्षांपासून दरवर्षी होणाऱ्या भारंगम (भारतीय रंग महोत्सव) या आंतरराष्ट्रीय महोत्सवात “ययाति” हे सादर झाले असून देश – परदेशातील सर्वोत्कृष्ट नाट्य महोत्सवांपैकी हा महोत्सव एक मानला जातो. 01 फेब्रुवारी 2025 पासुन देश विदेशातील 13 केंद्रावर सूरू असलेल्या या महोत्सवात जगभरातील अनेक भाषांमधील अनेक नाटके सादर झाली असुन 16 फेब्रुवारीला या महोत्सवाचा समारोप आहे. या वर्षी संपुर्ण देशातील नाटय संघांबरोबरच रशिया, , तैवान, श्रीलंका, पोलंड, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक आणि जर्मनी इत्यादि देशांतील कलाकारांचाही ‘भारंगम” मध्ये सहभाग आहे हे विशेष . सातत्याने देश-विदेशातील नाट्य कलाकारांना एकत्र आणण्याचे कार्य या निमित्ताने राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली करत असते.
या नाटकातील सहभागी कलावंत नाट्यशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील. आजी -माजी विद्याार्थी आणि प्राध्यापक आहेत हे विशेष.
बागबान थिएटर ग्रुपचे ‘ययाति’ नाटक “भारंगम” (भारत रंग महोत्सव) महोत्सवात बंगरुळू या ठिकाणी कलाग्राम या सभगृहात झाले असून ही छत्रपती संभाजीनगर, बीड आणि एकूणच मराठवाड्याच्या रंगभूमीसाठी एक मोठी उपलब्धी असल्याचे दिग्दर्शक असलम युनूस यांनी सांगितले .
गेवराई, बीड च्या भूमीत लहानाचे मोठे झालेल्या दिग्दर्शक, अभिनेता असलम युनूस यांनी नाट्यशास्त्र विभाग, आणि मराठवाड्यातील सर्व जेष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्यानेच नाटय प्रवास सूरु असल्याचे सांगितले.
ययाति नाटकातील सहभागी कलावंत : सैनिक – ऋषिकेश कारके, पांडुरंग शिंगारे, किशोर थोरात, गाणार वाल्मीक , औदुंबर वानखेडे
पुरू – शुभम कोल्हे, चित्रलेखा – प्रेरणा खरात, स्वर्णलता – पूजा पवार,शर्मिष्ठा – विशाखा शिरवाडकर,
देवयानी – उल्का कुलकर्णी,
ययाति – असलम युनूस
या कलाकारांनी अभिनय केला आहे. तर तांत्रिक बाबी नेपथ्य रामेश्वर देवरे, डॉ. गजानन दांडगे ,संगीत विनोद आघाव, रोहिदास सोमवंशी, आदित्य इंगळे,रोहन गहिरे ,
नृत्य दिग्दर्शन – व्ही. सौम्यश्री
प्रकाश योजना वाल्मीक जाधव, रंगभूषा – भाग्यरवी कुलकर्णी, वेशभूषा- कविता दिवेकर, रंगमंच व्यवस्थापक – सलमान शेख, भूषण खोडके , राहिल बागवान आणि दिग्दर्शक – असलम युनूस