बीड – गेवराई : धार्मिक कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या शिवसेना युवा नेता धर्मराज आहेर यांच्या गाडीला अपघात झाला असून, या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार ता. 10 रोजी दुपारी दोन वाजता गेवराई तालुक्यातील माटेगाव – खळेगाव रस्त्यावर घडली. अपघातात डॅमेज झालेली गाडी पाहून अनेकांना धक्का बसला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून, सहा पलट्या होऊन ही गंभीर जखमी झालेले दोघेही माय-लेक अपघातातून सहीसलामत वाचले आहेत. घटनेची माहिती समजताच, गेवराई तालुक्यातील अनेक सामाजिक-राजकीय चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आधार रूग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे.
धर्मराज आहेर रा. खळेगाव ता. गेवराई जि.बीड , हे राक्षसभुवन ता. गेवराई येथे सोमवार ता. 10 रोजी
धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या चार चाकी [ स्विफ्ट ] गाडीने घराकडे निघाले होते. त्यांची गाडी खळेगाव- माटेगाव फाट्याजवळ आली असता, अचानक एक दुचाकी वाहन समोर आल्याने, दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीने सहा पलट्या घेतल्या. झालेल्या अपघातात स्वतः धर्मराज आहेर यांच्यासह त्यांची आई चंद्रकला मधुकर आहेर [ वय वर्ष 60 ] हे दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघात दुपारी दोन वाजता, खळेगाव- माटेगाव रस्त्यावर घडला. जखमी अवस्थेत त्यांना गेवराई येथील आधार रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दोघे ही माय – लेक सुखरूप आहेत. धर्मराज आहेर यांच्या मातुश्री चंद्रकला आहेर यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांचा डावा हात फॅक्चर झाला आहे. धर्मराज आहेर यांना मुक्का मार लागला आहे. आधार रुग्णालयाचे संचालक डॉ. बी.आर. मोटे यांनी जखमींवर उपचार केले आहेत. युवा नेते माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, विलास सुतार,
युवा नेते यशराज पंडित यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या आहेत.