बीड – गेवराई :
गेवराई तालुक्यातील विविध वृत्तमान पत्र तसे साप्ताहिक,युट्यूब,वेब पोर्टलच्या सर्व संपादक पत्रकार यांची बैठक नुकतीच पार पडली. सर्वाच्या मतानुसार आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते संपादक अविनाश इंगावले यांची अध्यक्षपदी निवड जाहिर करण्यात आहे.
गेल्या पंदरा वर्षापासून गेवराई तालुक्यात विविध राज्य दैनिक तसेच डिजिटल युगात यशस्वी भरारी घेतली असल्या कारणाने व सर्वासोबत मैत्रीपुर्ण संबंध कायम प्रस्तापित करून गेवराई तालुक्यातील शहरी व ग्रामिन भागातील पत्रकार यांना कुठेही भेदभाव न करता चांगली कामगिरी संपादक अविनाश इंगावले यांनी केली असल्याने सर्वाच्या वतिने पत्रकार सुभाष शिंदे,व शेख जावेद यांनी संपादक अविनाश इंगावले यांच्या नावाची सुचना मांडली तसेच त्याला पत्रकार सोमनाथ मोटे व संपादक सय्यद बादशाह यांनी अनूमोदन केले तसेच नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत संपादक अविनाश इंगावले अध्यक्ष ,कार्यध्यक्ष शेख जावेद,उपाध्यक्ष सुभाष शिंंदे,सचिव सोमनाथ मोटे,संघटक सय्यद बादशाह यांची निवड प्रक्रीया जाहिर करण्यात आली असून सदस्यपदी श्याम जाधव,नवनाथ आडे,शेख अफरोज,शेख खाजा,अमोल भांगे,लक्ष्मण उमाप,सय्यद रेहान,देवराज कोळे,शेख मोहसिन,गणेश ढाकणे,अफसर शेख,ईम्राण सौदागर,शुभम घोडके,यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे तसेच झालेल्या निवडी बद्दल संपादक अविनाश इंगावले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.