मुंबई: गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते ६ यावळेत विष्णुदास भावे नाट्यगृह, सेक्टर -१६ ए, वाशी बस डेपो समोर, जुहू – वाशी रोड, वाशी, नवी मुंबई येथे दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
पहिले अखिल भारतीय महिला गझल संमेलन गेल्या वर्षी पुणे येथे पार पडले. दुसरे संमेलन नवी मुंबई येथे होत आहे. या संमेलनात संपूर्ण भारतातील गझलकार सहभागी होऊ शकतात. आजीवन सभासदांना प्रथम प्राधान्य असणार आहे. नावनोंदणी व सहभाग निःशुल्क असेल.

नावनोंदणीची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२५ अशी आहे. नाव नोंदणीसाठी मुंबई जिल्हाध्यक्षा सौ. प्रणाली म्हात्रे आणि मुंबई जिल्हा सचिव सौ. सोनाली जगताप यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धीप्रमुख भरत माळी, संमेलन समिती प्रमुख मुकुंदराव जाधव, संमेलन समिती समन्वयक प्रदीप तळेकर व मुंबई जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.
अधिक माहितीसाठी मो.नं ९८६९३३६३३७ ( मनोज वराडे- कोकण विभाग प्रमुख ) वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.