दु:खाची माया वेडी असते. रूग्णांचे नातेवाईक, आप्तेष्ट भांबवलेल्या अवस्थेत असतात. डॉक्टर सांगतील तसे ऐकतात, त्या प्रमाणे वागतात. मेडिकल वाला सांगेल तेवढे बील देऊन मोकळे होतात. डॉक्टर बीलाची पावती देत नाही आणि मेडिकल वाला ही, पावती न देता औषधाचे पैसे घेतो. मात्र, मेडिकल वाले पावती न देता मेडिसिन च्या माध्यमातून जास्तीचे पैसे घेऊन झोळ्या भरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एवढे सगळे बिनबोभाट सुरू असून, औषधी दुकानांवर देखरेखीसाठी असलेला ड्रग इन्स्पेक्टर फक्त मलिदा चाटायलाच नियुक्त करण्यात आलाय का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गोरगरीब रुग्णांचे नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या आशेवर दवाखान्यात, मेडिकल कडे आलेले असतात.त्यांना पैसा महत्त्वाचा नसतो. आपला रूग्ण बरा होऊन सुखरूप घरी जावा, एवढीच एक माफक अपेक्षा असते. परंतु , रुग्णांची आणि नातेवाईकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणाऱ्या मेडिकल वाल्यांनो देवाला तोंड दाखवायचे आहे. रुग्णांची लूट करू नका तुमच्या सात पिढ्या नरकात जातील, अशी जळजळीत प्रतिक्रिया एका रुग्णाने व्यक्त केली आहे.दरम्यान, पंतप्रधान जन औषधी मेडिकल केन्द्रात मिळणारी औषधी दुय्यम दर्जाची असतात. असा अपप्रचार बीड जिल्ह्य़ातले अनेक मेडिकल दुकानदार करीत असल्याची धक्कादायक बाब ही समोर आली आहे. वास्तविक पाहता, अशा सर्व केन्द्रात स्वस्त दरात मेडिकल औषधी भेटते. खास गोरगरीब घटकांसाठी ही योजना केन्द्र सरकारने आणि विशेषत: मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने अंमलात आणली आहे.तिथे प्रत्येक औषधीचे रितसर बील दिले जाते. हा सरकारी नियम आहे. मात्र, बीड जिल्ह्य़ातील अनेक मेडिकल दुकानात बीले दिली जात नाहीत. बीलाची मागणी केल्यास, अरेरावी केली जाते किंवा औषधी उपलब्ध नाही. असे सांगितले जाते. औषधी दुकानांची तपासणी करणारी सरकारी यंत्रणा आहे. त्यासाठी ड्रग इन्स्पेक्टर कार्यरत असतात. हे अधिकारी नियमित ठरावीक काळात येऊन जातात. आज पर्यंत एका ही दुकानांवर कारवाई झाली नाही. याचा अर्थ, सगळे दुकानदार नियमानुसार चालतात. असे सर्टीफिकेट ड्रग इन्स्पेक्टर दिले आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.दु:खाची माया वेडी असते. रूग्णांचे नातेवाईक, आप्तेष्ट भांबवलेल्या अवस्थेत असतात. डॉक्टर सांगतील तसे ऐकतात, त्या प्रमाणे वागतात. मेडिकल वाला सांगेल तेवढे बील देऊन मोकळे होतात. डॉक्टर बीलाची पावती देत नाही आणि मेडिकल वाला ही, पावती न देता औषधाचे पैसे घेतो. मात्र, मेडिकल वाले पावती न देता मेडिसिन च्या माध्यमातून जास्तीचे पैसे घेऊन झोळ्या भरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एवढे सगळे बिनबोभाट सुरू असून, औषधी दुकानांवर देखरेखीसाठी असलेला ड्रग इन्स्पेक्टर फक्त मलिदा चाटायलाच नियुक्त करण्यात आलाय का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, म्हातारी गेल्याचं दु:ख नाही.पण,
काळ सोकावू नये. मेडिकल दुकानांची तपासणी करण्यात यावी अशी, अशी कळकळीची आर्जव संबंधित रुग्णांने केली आहे.
सुभाष सुतार, पत्रकार – बीड