गेवराई : पंचायत समितीच्या इमारतीच्या बाजुलाच असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाला अचानक आग लागल्याची घटना रविवार ता. 16 रोजी दु. चार वाजता घडली आहे. आगीत पंचायत समिती मधील कार्यालयीन कागदपत्र जळून खाक झाली असून, ही कागदपत्र नेमकी कशाची आहेत. या संदर्भात, अधिकृत माहिती देण्यात आली नाही. येथे ,बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा एक विभाग कार्यरत आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या बीडीओ श्रीमती कांबळे यांनी तातडीने भेट देऊन जळालेल्या कार्यालयाची पाहणी करून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रविवार असल्याने पंचायत समिती परिसरात शुकशुकाट होता. सुट्टी असून ही, देशमुख नावाचा कर्मचारी तिथे तातडीने आल्याने आश्चर्य व्यक्त केलेजातअसून, आग लागली की लावली, या संदर्भात उलटसुलट चर्चा आहे.