गेवराई – बीड : शेतात जाण्या- येण्याचा रस्ता खुला करून द्यावा, या न्याय मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या एका शेतकऱ्याला अखेर चौदा वर्षानंतर न्याय मिळाला असून, प्रशासनाने लक्ष दिल्याने दैठण ता. गेवराई येथील सोमेश्वर आक्रुर पंडित यांना न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
दैठण ता. गेवराई येथील दोन भाऊ रस्त्यासाठी भांडत होते. दोघा मध्ये शेत रस्त्यावरून भांडण होते. सोमेश्वर आक्रुर पंडित यांनी अनेक वेळा अर्ज विनंत्या करून, सरकार दरबारी न्याय मागितला. परंतू , वादावर तोडगा निघत नव्हता. या शेत रस्त्याची तक्रार तलवडा ता. गेवराई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती.
शेवटी, सोमेश्वर पंडित यांनी 26 जानेवारी 2025 पासून
जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने त्यांना उपोषण करू नका, तुमचा प्रश्न सोडवू ,अशी सूचना केली होती. सोमेश्वर पंडित यांनी त्याकडे, दूर्लक्ष करून जोपर्यंत, मला नियमानुसार रस्ता आणि न्याय मिळत नाही. तोपर्यंत, प्राणांतिक उपोषण सरूच राहील. अशी रोखठोक भूमिका घेतली.सदरील उपोषणाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून गेवराई तहसील प्रशासनाले आदेश देण्यात आले. तहसीलदार खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कट्टे, मंडळ अधिकारी जितू लेंडाळ, पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता दैठण परिसरातील संबंधित शेतकर्याच्या बांधावर जाऊन सदरील शेत रस्ता खुला करून देण्यात आला.