गेवराई – जि.बीड : उन्हाळ्याची चाहूल लागताच, रसवंतीगृहाच्या घुंगराचा आवाज सुरू झाला असून; उसाच्या थंडगार गोड रसासाठी ग्राहकांची पाऊले रसवंतीगृहाकडे वळू लागल्याचे चित्र दिसून येत असून, गेवराई शहरातील पंचायत समिती परिसरातल्या सादेक-शाहेद बंधुच्या राज रसवंतीगृहाचे उद्घाटन सोमवार ता. 10 फेब्रुवारी 2025 रोजी रोजी
करण्यात आले आहे. गावरान रसाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसू लागली. यंदाचा उन्हाळा कडक जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, थंडगार पेयाची रेलचेल राहणार आहे.
गेवराई जि.बीड शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, नवे – जुने बसस्थानकासह गर्दीच्या ठिकाणी, गेवराई – जालना – बीड राष्ट्रीय महामार्गावर रसवंतीगृह सुरू झाले आहेत. गावरान रसाचा आस्वाद घेतला जात आहे. गेवराई शहरातील होतकरू युवकांनी रसवंतीगृह सुरू करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. पंचायत समिती परिसरात
सादेक-शाहेद बंधुचे राज रसवंतीगृह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे अस्सल गावरान उसाचा रस मिळतो. माफक दरात ग्राहकांना
ताजा रस दिला जात असल्याने, शासकीय कामासाठी आलेले नागरिक, राज रसवंतीगृहात आवर्जून भेट देत आहेत. या रसवंतीगृहात उसाच्या रसाचा आस्वाद घेत आहेत. कडक उन्हाळ्यात लिंबू शरबत, उसाचा रसाचा आधार घेतला जात आहे. उन्हाळा फारसा जानवत नसला तरी, दुपारच्या सुमारास उन्हाळाचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे, ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना थंडगार पेयांचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, उन्हाळ्याची चाहूल लागताच रसवंतीगृहाच्या घुंगराचा आवाज सुरू झाला असून, उसाच्या गोड रसासाठी राज रसवंतीगृहाकडे नागरिकांची पाऊले वळू लागल्याचे चित्र आहे.