पुणे : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सोमवार ता. 17 रोजी
लाईट हाऊस ,लेन नं 07 ,टिंगरे नगर या ठिकाणी ‘आढावा बैठक व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती सोहळा प्रदेशाध्यक्ष-राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
याप्रसंगी या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहराच्या निरीक्षक देवकीताई शिंदे , उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला पुणे शहर भावनाताई पाटील, आणि विजय मंगल प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शितलताई टिंगरे यावेळी उपस्थित होत्या. विविध क्षेत्रातील महिला मान्यवर या प्रसंगी उपस्थित होत्या
वडगावशेरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने या ठिकाणी वडगाव शेरी मतदार संघाचे अध्यक्ष गीतांजलीता हेंद्रे सारगे व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संतोषी गारवे,(वडगावशेरी मतदारसंघ उपाध्यक्ष ) अनिता कपूर, (उपाध्यक्ष) प्रेमा पाटोळे, (उपाध्यक्ष) जया मूकनक( संघटक) प्रीती काकडे (उपाध्यक्ष )ज्योती गिरीश घोरपडे (सरचिटणीस )सुमती स्वाती,( प्रभाग क्रमांक तीन चे अध्यक्ष) निर्मला मेरी (प्रभाग क्रमांक दोनचे अध्यक्ष) जुली रॉबिन्सन (चिटणीस )अर्पिता खरे (प्रभाग क्रमांक चार)मीना नेल्सन (प्रभाग क्रमांक पाचचे अध्यक्ष) रेखा रवींद्र वाटोळे (प्रमुख प्रभाग क्रमांक सहा चे अध्यक्ष) कल्पना लाहोरे (प्रभाग क्रमांक एकचे अध्यक्ष ) नीलम कठाणे ,या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहराच्या निरीक्षक देवकी ताई शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये उपस्थित व नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विजय मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी गेल्या अनेक वर्षापासून विजय मंगल प्रतिष्ठानच्या वतीने होणारे कामे याबद्दल सर्वांना माहिती दिली व नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.समाजसेविका श्रीमती आशा दीदी परदेशी, ज्योति भगत ,ज्योती राऊत, मंजुषा आणि इतरही महिला याप्रसंगी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव शेरी मतदारसंघाच्या अध्यक्षा गीतांजली हेंद्रे सारगे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे नियोजन ,संयोजन मृणाल सारगे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक अमरजीत यांनी केले.