बीड – गेवराई : गेवराई शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजुला असलेल्या अतिक्रमणावर अखेर हाताडो पडला असून, सोमवार ता. 24 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाने गेवराई नगर परिषदेच्या पथकाने कारवाई करून अतिक्रमण काढायला सुरुवात केली. अचानक झालेल्या कारवाईने खळबळ उडाली असून, अतिक्रमण धारकांनी कुठे जावे असा सलाम उपस्थित झाला.
गेल्या काही दिवसांपासून गेवराई-बीड राष्ट्रीय महामार्गावर, शहरातून जाणाऱ्या दोन्ही बाजुच्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे. या ठिकाणी लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या दुकाना आहेत. मात्र, सदरील अतिक्रमण रस्त्यावर आल्याने रहदारीस अडथळा निर्माण झालेला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना तीन महिन्यापूर्वीच नोटीस देऊन बजावण्यात आले होते. मात्र, अतिक्रमण धारकांनी त्या नोटीसला जुमानले नाही. काही होणार नाही. या आशेवर राहीलेल्या अतिक्रमण धारकांना अखेर सोमवारी ता. 24 रोजी अचानक “शाॅक” बसला.
नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाने सकाळीच कारवाईला सुरूवात करून गेवराई शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अतिक्रमणवर हातोडा चालवला. त्यामुळे, दुकानदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला. वेळेत दुकानातल्या वस्तू हलवता आल्या नाहीत. त्यामुळे, आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. कुठेही अतिक्रमण पथकाला विरोध झाला नाही. कित्येक वर्षानंतर रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून, रस्ता रूद झाला आहे.