बीड – महाराष्ट्रात गुंडगिरी का वाढली. त्याला कोण जबाबदार आहे. राजकीय नेते गुंडांना आणि त्यांच्या गुंडगिरीला पाठिशी घालतात का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. दरम्यान, पुणे येथील गुंड गजा मारणे याला अटक झाली असून, त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राजकीय नेते गुंडांना आश्रय देतात आणि त्या बदल्यात निवडणुकीत त्यांचा उपयोग करतात असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, एबीपी माझा या वाहिनीवर मंगळवार ता. 25 रोजी रात्री आठ वाजता महाराष्ट्रातील गुंडगिरी या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी झालेल्या चर्चेत एक निवृत्त पोलीस अधिकारी श्री. भानुप्रसाद बर्गे यांनी तत्कालीन गृहमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांची आठवण काढून, महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा पाढा वाचला. स्व. मुंडे साहेबांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर "करेक्ट कार्यक्रम" ही निती वापरली होती. असा आवर्जून उल्लेख करून, गुंडांचा बंदोबस्त त्यांनीच केला होता. त्यांच्या आधीच्या सत्ता काळात गुंडगिरी वाढली होती. हेच त्यांनी एबीपी माझा वाहिनीवर स्पष्ट पणे सांगितले.ते म्हणाले,
खर तर , 1980 च्या दशकात मुंबई, पुणे सारख्या शहरात गुंड आणि गुंडाचे टोळी युद्ध वाढले होते. त्याचा त्रास सामान्य माणसाला झाला. 1995 साली जेव्हा शिवसेना – भाजपाची सत्ता आली होती. गोपीनाथराव मुंडे गृहमंत्री झाले होते. त्यांनी गुंडगिरीला थारा न देता, पोलीसांना पूर्ण अधिकार देऊन, गुंडांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते. अशी कृतज्ञतापूर्वक आठवण निवृत्त पोलीस अधिकारी बर्गे यांनी काढली.
गुंडांना राजकीय आश्रय मिळाला की, ते राजकीय नेत्यांना ही सोडत नाहीत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार मध्ये गुंडांनी हैदोस घातल्याचे उदाहरण समोर ठेवले. उत्तर प्रदेश च्या एका गुंडाने थेट मुख्यमंत्र्यांना मारण्याची सुपारी घेतली होती. त्यानंतर, राजकीय नेत्यांना जाग आली. मग, उत्तर प्रदेश मध्ये एकाच वेळेस 43 गुंडाचे एन्काऊंटर करण्यात आले होते. असाच प्रयोग बिहार मध्ये राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एबीपी माझा च्या वाहिनीवर झालेल्या चर्चेत पत्रकारांनी सहभाग घेतला. गुंडांना आश्रय पुढारीच देतात, असे निरिक्षण त्यांनी नोंदवून, पोलीसांना स्वतंत्र अधिकार देण्या संदर्भात भाष्य केले. एबीपी माझाच्या ऑन लाईन सर्व्हे मध्ये प्रेक्षकांनी बेधडक प्रतिक्रिया नोंदवून गुंडांना 99% राजकीय संरक्षण असते. अशी मते नोंदविली आहेत.