Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय
No Result
View All Result
Loksamvad News | लोकसंवाद न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

वारसा स्वराज्याचा

संपादक सुभाष सुतार by संपादक सुभाष सुतार
February 27, 2025
in महाराष्ट्र
वारसा स्वराज्याचा

नमस्कार,
जय शिवराय, मी श्री विशाल संभाजी जगताप नाणी संग्राहक “वारसा स्वराज्याचा “यां नाणी संग्रहालयाचा संस्थापक आहे.मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी, पुरंदर या तालुक्यातील राजेवाडी हे माझे मूळ गाव असून संग्रहालय ही याच तालुक्यातील दिवेघाटा जवळ, हडपसर सासवड रोड, झेंडेवाडी येथे आहे.
२] आपल्या या संग्रहालयाची सुरुवात कशी झाली?*
उत्तर- मी साधारणतः दहावीला असताना म्हणजेच १९९८ सालची गोष्ट आहे, आमचे आजोबा हे आम्हा भावंडाना जी त्यांच्या काळातील जुनी नाणी त्यांनी जपून ठेवली होती ती नाणी आम्हा भावंडाना खेळायला द्यायचे, कारण त्या काळातील बाजारात चालत नसल्याने त्यांना काही आर्थिक मूल्य नव्हते, आणि तिथे खऱ्या अर्थाने माझ्या हातात जुनी नाणी आली ,पुढे दहावी झाल्यानंतर मी पुढील आयटीआयच्या शिक्षणासाठी बारामतीला गेलो होतो ,तिथे आम्हाला शिकवण्यासाठी लक्ष्मण गायकवाड सर हे शिक्षक होते .त्यांना नाणी जमावन्याचा छंद होता. त्यांनी एकदा आयटीआय मध्ये मुलांसाठी दुर्मीळ नाण्याचे छोटेखानी प्रदर्शन भरवले होते. त्यातील काही नाणी माझ्या संग्रही असल्याने मला त्या प्रदर्शनातून उत्सुकता निर्माण झाली. आणि त्यातून श्री गायकवाड सरांच्या मार्गदर्शनातून मला नाणी कशी जमा करावी, ती जतन कशी करावी, हे मार्गदर्शन मिळाले आणि एक एक नाणे मी जमा करत गेलो. ते आजपर्यंत माझा प्रवास सन २०१३ ते २०२५ चालूच आहे.
३] नाणी जमा कशी केलीत?अन त्या जमा करताना काय अडचणी आल्या?
उत्तर- नाणी जमा करण्यासाठी जुन्या वयस्कर लोकांना गावोगावी जाऊन भेटणे, नाही त्यांना माझ्या छंदा बदल सांगून विश्वास देणे की आपण दिलेल्या नाणी मी यापुढे कायम जतन करून ठेवणार आहे अशाप्रकारे काही लोकांनी मला नाणी दिली, त्यावेळेस सामान्यपणे व्यवहारात हातात येणारे नाणे निरखुन पाहायचो त्याचदरम्यान माझ्या एका मित्राचे वडिलांचे किराणा दुकान होते, त्यामध्ये गल्ल्यात जमा होणारी नाणी, नोटा आम्ही चार चार वेळा पाहून वेगळी चित्र असणारी म्हणजेच commomertina coin (स्मरणार्थ नाणी) वेगळी करायचो. पुढे शिक्षण झाल्यानंतर पुण्यामध्ये चिंचवड या ठिकाणी एका कंपनीमध्ये मी जॉबला लागवड तिथे मला नुकताच कामावर नव्याने लागलेल्या मित्र अभिजीत भेटला तो, मुळचा कोल्हापूरचा होता, त्याच्याकडून कळाले की त्यांच्या येथे एक झारी नावाची जमातीची लोक आहेत, ती अगदी पाण्याच्या तळाशी जाऊन ही जुनी लोकांनी पाण्यात टाकलेली नाणी शोधतात आणि ती अगदी कमी पैशात विकता. कारण पूर्वीपासून नदीला देवता मानण्याची प्रथा असल्याने नदीत लोक नाणी वाहतात, टाकतात मग काय त्यानिमित्ताने आमच्या कोल्हापूरच्या वाऱ्या चालू झाल्या. तेथून काही नाणी मिळाली,काही नाणी, परदेशी नोटा ,नाणीही नातेवाईकातील परदेशी असलेल्या व्यक्तीकडून मिळवली.पुढे इंटरनेट चे युग आले .मोबाईल हातात आला. नाण्यांचा अभ्यास वाढला ,काही प्रदर्शनात नाण्यांची विक्री होतात ही कळाले.काही नाणी लिलावात मिळतात हे कळाले पण त्यासाठी जवळ पैसे हवेत .मग मी कंपनीत एक वेळचं जेवण करायचो, रूम जवळची खाजगी मेस बंद केली, त्यातून पैसे राहायचे, मला कुठेही व्यसन नसलयाने त्यातून बचत करत गेलो आणि नाणी जमवत गेलो.
४] वारसा स्वराज्याचा ‘ ची निर्मिती कशी झाली?
उत्तर : मी आयटीआय झाल्याने सुरुवातीला पिंपरी चिंचवड MIDC मध्ये २-३ कंपनीमध्ये टेंपररी म्हणुन जाॅब केला .पुढे पुढे २००४ साली मी पेनंट इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड या ट्रप टिम बनवण्याच्या कंपनीत जॉब लागला आणि तेथेच पर्मनंट झालो .तेथेही हा छंद चालुच होता.सुट्ट्या व्हायच्या मेमो घरच्या पत्त्यावर यायचे ,कंपनीत ही वर्कर्स मध्ये प्रमोशन गटगीरी असायची पण सुट्टयामूळे प्रमोशन ही होत नव्हते . त्यामुळे पगार इतरांपेक्षा थोडा कमी व्हायचा. दरम्यानच्या काळात लग्नही झाले,बाळ ही झाले. संसाराची जबाबदारी ही वाढली .बायको ही वैतागायची .तिला आजपर्यंत कुठे फिरण्यासाठी नेता आले नाही. पुढे 2014 साली कंपनीत व्यवस्थापन व कामगार युनियन चया वादातुन कंपनी बंद झाली.आणि मी बेरोजगार झालो.नवीन ठिकाणी जाॅब ला लागलो तर करोना आला आणि जॉब गेला, कारण सगळे जग थांबले होते. त्या करोनाच्या काळात ठरवल आपण आता जॉब न करता व्यवसाय करु.दरम्यान मोबाईलवर एक लेख माझ्या वाचण्यात आला की,तुम्ही तुमच्या छंदाचे रुपांतर व्यवसायात करू शकता .मग काय काही तरी काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले. लोकांनी आपल्याकडेच का याव? यासाठी ,पाहण्यासाठी नाणी संग्रहालय तसेच आलेल्या लोकांना खाण्यासाठी छोटे हॉटेल, खरेदी करण्यासाठी छञपती शिवाजी महाराजांची पुस्तके ,किचेन,चंद्रकोर महाराजांच्या छोटया मूर्त्या,असे शिव साहित्य ही विक्री साठी ठेवले आणि त्यातूनच वारसा स्वराज्याचा याची निर्मिती झाली .
५] नक्की संग्रहालयाचा उद्देश काय होता?
उत्तर- मूळ उद्देश होता की शिवछत्रपतींच्या चलनाचा वारसा जनसामान्यापर्यंत पोहोचवा, विशेषता शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ,त्यासाठी आपण नाममात्र तिकीट दरामध्ये त्यांना जगभरातील 450 पेक्षा अधिक नाणी ,नोटा पाहता येतील ,तसेच आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना आपण खास सवलत देतो ,तसेच आलेल्यांना संग्रहालयात च पौष्टिक खाद्यपदार्थ खाता यावेत म्हणून थालीपीठ, मेथी थेपला, कोथिंबीर वडी,आळुवाडी, हाताने बनवलेली ताक, लस्सी, याचे छोटेखानी हॉटेलही आम्ही तिथेच केले, तसेच मुलांना ,मोठ्यांना खरेदी करता यावे म्हणून शिव साहित्य ही आम्ही तेथे विक्री करतो. त्यातुन दोन पैसे मिळून संसारी ही चालतो. लोकांना दुर्मीळ ठेवा पाहायला ही मिळतो, आणि आपला छंदही जोपासता येतो, आवडीच्या क्षेतात काम करण्यासारखे हे दुसरे भाग्य नाही.
६] संग्रहालयाचे वैशिष्ट्य काय आहेत ?
उतर- संग्रहालयामध्ये भारतीय नानांमध्ये आत्ताच्या चालू चलनापासून अगदी कवडी अश्मयुगीन नाण्यापर्यंतची नाणी आहेत. परदेशी नाण्यांमध्ये २४२ देशाच्या बॅक नोटा,१० ग्रॅम ,पासुन १कि.ग्रॅम पर्यंतची नाणी आहेत.विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराई आणि बँक ऑफ अमेरिकेने बनवलेले होनची अस्सल सोन्याची नाण्यांची प्रतिकृती ही संग्रहात आहे .महाराजांचे पोस्टाचे विविध स्टॅम्प, आर्मीचे पोस्टाचे कवर 1999 ला भारत सरकारने महाराजांच्या स्मरणार्थ काढलेले शंभर रुपयाचे दुर्मीळ नाणेही संग्रहालयात पाहायला आहे. तसेच परदेशातील प्लॅस्टिकच्या बँक नोट एक ,१कि.ग्रॅ.चे माल्टा देशाचे प्लास्टिकचे ट्रान्स निस्ट्रिया या एकमेव देशाने काढलेली नाणेही संग्रहालयात आहे.तसेच अॅन्टिजिया या देशाने काढलेली जगातील पहिली सोन्या चांदीची नोट जगभरातील हिंदू देवी- देवतावर काढलेली नाणी ही संग्रहालयात पाहण्यासाठी आहेत.
७] वारसा स्वराज्याचा” हेच नाव संग्रहालयाला देण्याचे काही खास कारण ?
उत्तर- हो कारण आहेच, मुख्य म्हणजे शिवछत्रपतींचे प्रत्येक कार्य हे रयतेसाठीच होते म्हणून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, चलनाची निर्मिती त्याच भावनातून झाली. ६ जून १६७४ ला महाराजांचा विषय झाला. आणि त्यांनी राज्याभिषेक वेळेसच आपली स्वतःची तांब्याची शिवराई आणि सोन्याची होन ही दोन नाणी स्वराज्यात चालू केली. महाराज रयतेचे कायम हित पाहणारे असल्याने अगोदर चलनात असलेले इंग्रजांचे कोपरून हे नाणे महाराजांनी बंद केले .आणि राज्याभिषेक दिनी महाराजांपूढे हेनरी ऑकझेंटन याने आमचे चलन तुम्ही स्वीकारून ते स्वराज्यात चालु ठेवा ही मागणी धुडकावून लावली.म्हणुन अशा या आपल्या दैवत असणारे शिवछत्रपतींचा वारसा आम्हाला जतन करून पुढील पिढीला द्यायचा असल्याने “वारसा स्वराज्याचा’ हे संग्रहालयाचे नाव आम्ही दिले.आणि आमची एक टॅग लाईन आहे ,वारसा स्वराज्याचा ‘संग्रहालय आपला इतिहास ,आपला अभिमान!
८] आपल्याशी संपर्क कसा करावा? संग्रहालयाचा पत्ता काय आहे?
उत्तर- हडपसर सासवड रोडवर दिवे घाटाच्या अगदी पाचशे मीटरवर रोडवरच आपल्याला किल्ल्याचे रुद्रकार असणारे वारसा स्वराज्याचा नाणी संग्रहालय नजरेस पडेल .
अधिक माहितीसाठी आपण संपर्क करु शकाल : ९९७०४२९२३६

                                    [ मुलाखत : श्री.विशाल संभाजी जगताप]
              

Previous Post

कुसुमाग्रज यांच्या कविता जगण्याची प्रेरणा देतात – प्रा. डॉ. संगीता आहेर

Next Post

प्रवाही सिंचनाचा कालवा वाचला – सरकारचे कालवा धोरण,शेतकर्‍यांच्या दारावर सिंचनाचे तोरण

संपादक सुभाष सुतार

संपादक सुभाष सुतार

Next Post
प्रवाही सिंचनाचा कालवा वाचला – सरकारचे कालवा धोरण,शेतकर्‍यांच्या दारावर सिंचनाचे तोरण

प्रवाही सिंचनाचा कालवा वाचला - सरकारचे कालवा धोरण,शेतकर्‍यांच्या दारावर सिंचनाचे तोरण


ताज्या बातम्या

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

आमन सुतार यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्या – मातंग समाजाची मागणी

December 28, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

बाळराजे पवार – सिर्फ नाम ही काफी है…!

December 21, 2025
कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

कायदा हातात घेऊ नका, गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर , शहरात तगडा बंदोबस्त – पोनि. किशोर पवार

December 20, 2025
गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

गेवराईत थरार – पोलीसांचे कौतुक,

December 18, 2025
जामीन मंजूर  – बाळराजे पवार अटक प्रकरण

जामीन मंजूर – बाळराजे पवार अटक प्रकरण

December 17, 2025
पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

पोलीस ठाण्यात हजर होताच बाळराजे पवार यांच्यावर अटकेची कारवाई

December 16, 2025
  • Contact Us
  • About Us

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • गेवराई
  • राजकारण
  • मनोरंजन
  • विश्लेषण
  • क्राईम
  • कृषी विशेष
  • शिक्षण
  • संपादकीय

© 2025. Website Development Mahesh Vispute (Beedkar) : 9822318809

Join WhatsApp Group