गेवराई : येथील सामाजिक कार्यकर्ते, नप चे माजी सदस्य आवेझ शेठ यांची मुलगी जरमीन आवेझ शरीफ हिने वयाच्या आठव्या वर्षी, दि. 8 मार्च 2025 रोजी आपल्या आयुष्याचा पवित्र असा पहिला रोजा [ उपवास ] ठेवला. जरमीन यांच्या कृतीचे समाजबांधवांनी कौतुक केले असून, तिच्या नातेवाईकांनी जरमीन हिला शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिलेत. रमजान महिन्यात रोजा [ उपवास ] ठेवून अल्लाह [ इश्वर ] चे नामस्मरण केले जाते. दिवसभर अन्न-पाण्याचा एक थेंब ही न घेता कडक उपवास केला जातो. सायंकाळी दिलेल्या वेळेत उपवास सोडला जातो.