बीड – गेवराई :
पाथरवाला बु येथील सत्यभामा प्रतिष्ठाण संचलित सत्यभामा इंग्लिश स्कुल चे 10 वार्षिक स्नेहसंमेलन दि. 9 रविवार रोजी सायं 7 वाजता सौ. गीताभाबी बाळराजे पवार, प्रवाह अनाथलायचे प्रा. रामेश्वर गोर्डे, समाजसेवक सुभाष काळे सर, पवन चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश चेके,नंदू काका गोर्डे, बाबासाहेब जाधव, वसंत मस्के, संदीप कुऱ्हाडे, यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक, हिंदी, मराठी चित्रपटातील गाण्यावर मुलांनी नृत्य सादर केले.
यावेळी सौ. गीताभाबी पवार, प्रा. रामेश्वर गोर्डे सर, सुभाष काळे सर यांनी मनोगत व्यक्त केले, ग्रामीण भागात दर्जेदार इंग्रजी माध्यमाच शिक्षण सत्यभामा इंग्लिश स्कुल मागील दहा वर्षा पासून देत आहे भविष्यात या शाळेचे विद्यार्थी भारताचे सुसंस्कृत नागरिक घडावे, अधिकारी बनावे असा शुभेच्छा मान्यवरानी दिल्या, डॉ. गणेश चेके यांनी प्रास्ताविक केले. सामाजिक भावनेतून या शाळेची आम्ही स्थापना केली आहे ना नफा ना तोटा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा हेतू आहे असे ते यावेळी म्हणाले.
सूत्रसंचालन संचालक महेश चेके सर यांनी केले. यावेळी शिक्षक सौ.अपेक्षा चेके, सौ.स्नेहल शेळके, राजेंद्र भवार, कौस्तुभ पवार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या वेळी उपस्थित विलास वाघमोडे, मंगेश खरात,बंडू गवारे संदीप जाधव अविनाश गिरी बाबा खरात बळीराम गंगाधर सचिन बने, नवनाथ पारे, उद्धव पारे, दत्तात्रय पवार, विकास शेळके, राजेंद्र बने,शामराव चेके,सतिष बने विलास चेके, विनोद खरात,प्रणव चेके, बंडू धारकर, भारत जाधव व मुलांचे कौतुक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.