बीड – गेवराई :
येथील शेख जा़रा 9 वर्षीय आणि शेख इख़रा 7 वर्षीय दोन बहिणीने आपले पहिले रोजे पुर्ण केले आहे. रमजान महिना मुस्लीम बांधवाचा पवित्र महिना मानला जातो, यात महिना भर रोजा केला जातो.
शहरातील मोमीन पुरा येथील रहिवासी शेख मुजाहेद यांच्या 9 आणि 7 वर्षीय मुलींनी गुरूवार रोजी पहिला रोजा पुर्ण केला. रमजान महिन्यातील सुरुवातीचा पहिल्या गुरुवारी 06-03-2025 (5 वा) उपवास होता त्या दिवशी या दोन्ही बहिणीने एवढ्या छोट्या वयात उपवास करुण ५ वेळच्या नमाज पठण करुण धार्मीक ग्रंथाचे वाचन केले. त्यामूळे चिमुकली जा़रा आणि इख़राचे वडील शेख मुजाहेद, आई शेख ईरफाना, आजी शेख साजेदा बेगम, भाऊ अन्सारी अरीब, शेख हमझा, बहीण अन्सारी सारा, शेख सफुरा, काका शेख वाजेद, अंकल अन्सारी तबरेझ, शेख हाफिज़, आण्टी अन्सारी रुहिना, शेख हीना, शेख सना सह सर्वांनी कौतुक केले.