गेवराई – बीड : गेवराई नगर परिषदेचे कर्मचारी संजय रत्तनराव कापसे यांची कन्या सारिका संजय कापसे हिने वैद्यकीय परिक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून, बी.डी.एस. [ दंत चिकित्सक ] च्या शेवटच्या वर्षात महाविद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
डॉक्टर सारिका संजय कापसे हिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
बीड येथील आदित्य डेंडल महाविद्यालयात कु. कापसे हिने बीडीएस चे शिक्षण पूर्ण केले आहे. 11 मार्च 2025 रोजी वैद्यकीय परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असून, बीडीएस [ दंत चिकित्सक ] च्या अंतीम वर्षात डॉक्टर सारिका कापसे हिने महाविद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, आदित्य वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी
तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. कु. सारिका कापसे, गेवराई नगर परिषदेचे कर्मचारी संजय कापसे यांची मुलगी आहे.