गेवराई – बीड : किडनी आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांसाठी, गेवराई येथील तिरुपती रूग्णालयाने डायलिसिस सेंटरची सुविधा उपलब्ध केली असून, येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. अशी, माहिती रुग्णालयाचे संचालक डॉक्टर गोविंद पंडितराव लेंडगुळे [ पाटील ] यांनी दिली आहे.
तिरुपती रूग्णालयात विविध आजाराच्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील. गरजू
रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ही रुग्णालयाने केले आहे. गेवराई शहरातील नवीन बसस्थानकाच्या शेजारी, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिरुपती रुग्णालयात महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत डायलिसिस सेंटर करण्यात आले आहे. ही सुविधा पूर्णत: मोफत आहे. रुग्णांना कोणताही खर्च येणार नाही. तिरूपती रूग्णालय,
30 खाटाचे सुसज्ज असे रुग्णालय असून, येथे
6 अतिदक्षता विभाग, नवजात बालकांसाठी 3 स्पेशल बेडची सुविधा, अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, अनुभवी व तज्ञ डॉक्टर आणि 24 तास मेडिकलची सुविधा उपलब्ध आहे. या रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यिसाठी डॉ. विजय सिकची, डॉ. अमर राठी, डॉ. गायत्री लेंडगुळे [ पाटील ] , डॉ. तुषार खरमाटे, डॉ. आदित्य जरांगे, इ. डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. गेवराई तालुक्यातील पहिले डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आल्याने, रुग्णांची चांगली सोय झाली आहे. दरम्यान, तिरुपती रूग्णालयात ब्लड स्टोरेज सेंटर ही आहे. त्याचा चांगला उपयोग शहरातील रूग्णालयांना होत आहे.
हाडाच्या विविध शस्त्रक्रिया, ही, मोफत योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. तसेच, सुसज्ज डिलिव्हरी विभागाच्या माध्यमातून माफक दरात सेवा दिली जाते.
अशी, माहिती रूग्णालयाचे संचालक डॉ.गोविंद पंडितराव लेंडगुळे यांनी दिली आहे.






