[ भाग – 8 ]
गेवराई  – बीड : सुभाष सुतार : बीड जिल्ह्य़ातील गेवराई तालुका शेतीसाठी अग्रेसर राहीलेला तालुका आहे. गोदावरी, सिंधफणा आणि उजव्या कालव्याने अर्धा मतदारसंघ पाणीदार केलाय. मात्र, अर्धा मतदारसंघ दुर्लक्षित राहीला. या भागातील शेती क्षेत्र बारमाही कोरडवाहू राहीले आहे. उजव्या कालव्याला जोडून धोरणात्मक निर्णय घेता येईल का ? असा यक्ष प्रश्न विचारला जात आहे.
 गेवराई जि.बीड मतदारसंघातील शेती पाण्यावर अवलंबून असली तरी, या मतदारसंघातला अर्धा अधिक भाग पाणीदार आहे. पावसाळी हंगामात सर्वाधिक क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. गोदावरी, सिंधफणा आणि उजव्या कालव्यावर ऊसाचे क्षेत्र आहे. ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या संकल्पनेतून जय भवानी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाल्याने, उपलब्ध पाण्यावर ऊसाची शेती उभी राहीली. त्याचा मोठा फायदा शेतकर्यांना झाला आहे. बारमाही शेतीला पूरक स्तोत्र उपलब्ध पाण्याच्या परिसंस्थेमुळे शेतकर्याना मिळाला आहे. मात्र, गेवराई मतदारसंघातला अर्धा भाग कोरडवाहुच राहीला. दुष्काळग्रस्त परिसर म्हणून उमापूर, चकलांबा, मादळमोही सारखा मोठा भाग, आजही ओळखला जातो. उमापूर आणि चकलांबा परिसराच्या अगदी शेजारीच उजवा कालवा, गोदावरी नदीचे पात्र आहे.मोठा स्तोत्र असलेली पाणी परिसंस्था शेजारीच आहे. उजवा कालव्यातून उप-कालवा धोरण जाहीर करण्याला वाव आहे. सामुहिक पातळीवर निर्णय घेऊन शेतकर्यापर्यंत पाणी देता येईल, या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधींनी पाऊल टाकावे,अशी अपेक्षा या परिसरातील शेतकरी व्यक्त करत आलेत. उजव्या कालव्याच्या नवनिर्माणासाठी तत्कालीन आमदार लक्ष्मण पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. सरकारने जवळपास पाचशे कोटी रू चा निधी दिला. कालव्यावर नव्याने अस्तारीकरण टाकून दुरूस्तीचे काम सुरू आहे. उप-कालवा करण्यासाठी विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी दखल घेऊन, कोरडवाहू क्षेत्रातील शेत जमीनी पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे. त्या दृष्टीकोनातून विचार झाल्यास, एक मोठे क्षेत्र ओलिताखाली येईल. गेवराई तालुका शेतीसाठी अग्रेसर राहीलेला तालुका आहे. गोदावरी, सिंधफणा आणि उजव्या कालव्याने अर्धा मतदारसंघ पाणीदार केलाय. मात्र, अर्धा मतदारसंघ दुर्लक्षित राहीला आहे. या भागातील शेती बारमाही कोरडवाहू राहीली. उजव्या कालव्याला जोडून धोरणात्मक निर्णय घेता येईल का ? असा यक्ष प्रश्न विचारला जात आहे.
			





