[ भाग – 9 ]
गेवराई दि. 11 : वार्ताहर : पैठण उजव्या कालव्यातून उप कालवा धोरणाच्या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. खडकं-मडकं ता. शेवगाव ते चकलांबा, उमापूर, पाचेगाव परिसर ते सिंदफणा नदीला जाऊन मिळणारा उप – कालवा अजूनही करता येईल. तसे झाल्यास, जवळपास 175 गावांना लाभ होईल. त्यासाठी, सरकार कडे पाठपुरावा करून, या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला “पुश” करण्याची गरज आहे. मराठवाड्यातील शेती सिंचनाकडे सरकारकडून वाॅटर ग्रीड प्रकल्पावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे, उजव्या कालव्यातून उप कालवा धोरणाला बळकटी देणे आवश्यक आहे.
 पैठण धरणाच्या खालोखाल असलेल्या उजव्या - डाव्या कालव्यावर हजारो एक्कर जमीन ओलिताखाली आलेली आहे. उजवा कालवा गेवराई जि.बीड मार्गे माजलगाव डॅमला जाऊन मिळतो. हा कालवा पैठण जि. संभाजीनगर, शेवगाव जि. अहिल्यानगर परिसरातून  बीड जिल्ह्य़ातून जातो. खडक-मडक  ता. शेवगाव परिसरातून जाणारा उजवा कालवा वळसा घालून पुढे गेलेला आहे. याच ठिकाणाहून उप कालव्याचा प्रस्ताव देण्यात आलेला होता. खडक-मडक ता. शेवगाव परिसरा पासून चापडगाव, लाड जळगाव,  बोधेगाव, बालमटाकळी, चकलांबा, तरडगव्हाण, खळेगाव, शेकटा, बंगाली- पिंपळा, मादळमोही, सिरसदेवी,  पाचेगाव परिसरातून सिंदफणा नदी पर्यंतचा मार्ग ठरवण्यात आला होता. पैठण उजव्या कालव्यातून उप कालवा धोरणाच्या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सरकार कडे पाठपुरावा करून, या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला "पुश" करण्याची गरज आहे. पैठण धरणाच्या खालोखाल असलेल्या उजव्या  - डाव्या कालव्यावर हजारो एक्कर जमीन ओलिताखाली आलेली आहे. उजवा कालवा गेवराई जि.बीड मार्गे माजलगाव डॅमला जाऊन मिळतो. हा कालवा पैठण जि. संभाजीनगर, शेवगाव जि. अहिल्यानगर परिसरातून  बीड जिल्ह्य़ातून जातो. खडक-मडक  ता. शेवगाव परिसरातून जाणारा उजवा कालवा वळसा घालून पुढे गेलेला आहे. याच ठिकाणाहून उप कालव्याचा प्रस्ताव देण्यात आलेला होता. या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. तसे झाल्यास, गेवराई मतदारसंघातील जवळपास 175 गावातील शेतीला फायदा होऊ शकतो. हा कालवा 
चापडगाव, बोधेगाव, बालमटाकळी, चकलांबा, खळेगाव, शेकटा, बंगाली- पिंपळा, मादळमोही, सिरसदेवी परिसरातून सिंदफणा नदी पर्यंत, प्रवाही सिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर घेऊन जाता येईल. उजव्या कालव्यावर उप-कालवा व्हावा म्हणून गेवराई तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलने झालेली आहेत. ज्येष्ठ कार्यकर्ते मच्छिंद्र गावडे यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा उपोषण, पाणी परिषदा पार पडल्यात. सरकार दरबारी आंदोलने झाली. त्याची दखल घेण्यात आली. मात्र, फारसा उपयोग झाला नाही. चकलांबा, उमापूर ही दोन गावे मोठ्या बाजार पेठेची आहेत. या परिसरातील शेतकर्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभे करण्याची गरज आहे. उप कालव्यावर 175 गाव परिसरातील शेती सिंचनाखाली येणार असेल तर, लोकशाही मार्गेने आंदोलन उभे राहील का ? हा प्रश्न आहे.
			





