[ भाग – 10 ]
गेवराई – बीड : सुभाष सुतार : गेवराई मतदारसंघात पावसाचे सरासरी पर्जन्यमान कमी – जास्त आहे. सरासरी पेक्षा पाऊस कमीच पडतो. काही भागात पावसाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत गेली आहे. 118 गाव परिसरातील शेती कोरडवाहू आहे. 65 गाव परिसरातली शेती पाट पाण्याखाली आहे. उर्वरित मोठा भाग कोरडवाहुच राहीला. एकुण भौगोलिक क्षेत्रातील सर्वाधिक क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे, हा भाग सिंचनाखाली कधी येणार की नाही ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेवराई तालुक्यात जवळपास एक लाख 35 हजार हेक्टर शेत जमीन उपलब्ध आहे. त्या पैकी 98 हजार हेक्टर शेत जमीन निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणजेच, पूर्णत: कोरडवाहू आहे. कोरडवाहू जमीन क्षेत्रात सर्वाधिक अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाची संख्या आहे. शेती असून देखील, या कुटुंबातली मंडळी उदरनिर्वाह करण्यासाठी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात गेली आहे. काही शेतकरी दरवर्षी उसतोड मजूर म्हणून बाहेरच्या जिल्ह्यात जातात. पावसाळ्यात शेती करून, उसतोडी करून घर प्रपंच चालविला जातो. अशी 118 गावे गेवराई मतदारसंघात आहेत. ही गावे कोरडवाहू आहेत. या गाव परिसरात तलाव, नदी, नाले आहेत. मात्र, पूर्व-पश्चिम पट्टय़ात ; म्हणजेच सिरसदेवी, पाचेगाव, मादळमोही, बंगाली पिंपळा, उमापूर, माटेगाव, चकलांबा परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. दर वर्षी या पट्टय़ात खूपच कमी
पाण्याच्या उपलब्ध परिसंस्थेत पावसाळ्यात कमी-अधिक प्रमाणात पाणी साठा होतो. हा साठा जानेवारी – फेब्रुवारीपर्यंत संपलेला असतो. उदाहरणार्थ, उमापूर परिसरात असलेले पाझर तलाव डिसेंबर च्या पहिल्याच आठवडय़ात कोरडेठाक पडलेले असतात. हे चित्र, गेल्या अनेक वर्षांपासून आहे. तीच परिस्थिती इतर सर्व पाझर, गाव तलावाची आहे. तलाव, नदी, नाले आटल्यावर विहिर, बोअर मध्ये पाणी साठा खोलवर जातो. या कोरडवाहू पट्टय़ात उस लागवडीला उपयुक्त क्षेत्र आहे. चांगली जमीन आहे. मात्र, सिंचन प्रकल्प नाही. मग, ऊस उत्पादक शेतकरी कसा तयार होईल. पाणी नाही, ही खरी मेख आहे. सिरसदेवी – पाचेगाव च्या बाजुलाच सिंदफणा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. या पात्रात उजव्या कालव्यातून पाणी पोहच करण्याची गरज आहे. तसे झाल्यास, सिरसदेवी – मादळमोही – उमापूर -चकलांबा असा पूर्व- पश्चिम उभा पट्टा पाणीदार करता येईल. शेवगाव जि. अहिल्यानगर पासून उजव्या कालव्यावर उप – कॅनाल काढून 118 गावे सिंचनाखाली आणता येतील. या परिसरात सरासरी पेक्षा पाऊस कमीच पडतो. काही भागात पावसाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत गेली आहे. 118 गाव परिसरातील शेती कोरडवाहू आहे. 65 गाव परिसरातली शेती पाट पाण्याखाली आहे. उर्वरित मोठा भाग कोरडवाहुच राहीला. एकुण भौगोलिक क्षेत्रातील सर्वाधिक क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे, हा भाग सिंचनाखाली कधी येणार की नाही ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
			





