गेवराई – बीड : एखाद्या माणसाच्या मनात घर करायचे तर, आधी त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. त्यासाठी, बांधिलकी आणि स्वतःच्या स्वभावात निस्वार्थ भाव असला पाहिजे. बजरंग बली हनुमानास साक्षात श्रीराम – सितामाईच्या पायाजवळ बसण्याची संधी मिळाली. भगवंताच्या पायाजवळ निस्वार्थ भावनेने बसणारांचीच नोंद होते. म्हणूनच, श्री हनुमानाचे गावागावात मंदिर उभे राहीले आहेत. असे प्रतिपादन किर्तन केसरी हभप अक्रुर महाराज साखरे यांनी येथे केले. गेवराई येथील श्रीराम हाॅस्पिटल येथे रविवार ता. 6 रोजी अकरा वाजता
आयोजित श्रीरामनवमी उत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉक्टर मोटे परिवारासह मान्यवरांची उपस्थिती होते.
गेवराई येथील श्रीराम हाॅस्पिटल, च्या माध्यमातून दरवर्षी श्रीरामनवमी उत्सव आयोजित करण्यात येतो. 6 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामनवमी उत्सवात ख्यातनाम किर्तनकार हभप अक्रुर महाराज साखरे यांची किर्तन सेवा पार पडली. त्यांच्याच उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव उत्सव पार पडला. उपस्थित महिलांनी पाळणा गाऊन श्रीराम जन्म उत्सवात भक्तीचा रंग भरला.
भगवान श्रीरामाची महती सांगताना हभप अक्रुर महाराज म्हणाले की, कोणताही भक्ती मार्ग माणसाला सुख-शांती मिळवून देतो. देवाला भक्त आवडतात. भक्ती मार्गाने देवाची आठवण काढणाऱ्या भक्तांची देव आठवण ठेवतो. भक्तीत निस्वार्थ भाव ठेवून पुढे गेले पाहिजे. कसलीही अपेक्षा न ठेवता भजन-किर्तन करा, दीन-दुबळ्यांची सेवा करा, आई – वडील , नातेवाईकांना जपा, हीच खरी प्रभू श्रीरामाची भक्ती आहे. एकवचनी श्रीरामाने जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्याच आदर्शाची गरज असून, सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.
ही गौरवास्पद बाब आहे. ते म्हणाले की,एखाद्या माणसाच्या मनात घर करायचे तर, आधी विश्वास संपादन करावा लागतो. त्यासाठी, स्वतःच्या स्वभावात निस्वार्थ भाव पाहिजे. बजरंग बली हनुमानास साक्षात श्रीराम – सितामाईच्या पायाजवळ बसण्याची संधी मिळाली. केवढे भाग्य आहे. भगवंताच्या पायाजवळ निस्वार्थ भावनेने बसणारांचीच नोंद होते. पोटात एक आणि ओठांवर दुसरेच, या नितीला भगवंत थारा देत नाहीत. अपप्रवृत्तींचा नाश करण्याची ताकद भगवंता जवळच आहे. आज,सगळीकडेच श्री हनुमानाचे गावागावात मंदिर उभी आहेत. तीच खरी निष्ठा आणि भक्तीचा संगम आहे.
समाजात ,यापेक्षा वेगळे काही नाही. समाजातल्या सर्व स्तरातील घटकांना न्याय देणारेच समाजाच्या कौतुकाचे विषय ठरतात. गाव, अशा भक्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहतो. गावाला उपाशी ठेवून, ब्रेड खाणारांना गाव थारा देत नसल्याचे निरिक्षण ही, त्यांनी यावेळी नोंदवून, पत्नीने पतीला आणि पतीने पत्नीला आदरभाव देऊन, या नात्यांना एका विश्वासाच्या उच्च पातळीवर घेऊन जाण्याची गरज आहे. अशी अपेक्षा, हभप अक्रुर महाराज साखरे यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली. श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमास, प्रा. गोवर्धन आबुज , शिनू भाऊ बेद्रे , ज्येष्ठ संपादक शिवाजी मामा ढाकणे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार, पत्रकार नाना जोशी, संपादक अमोल वैद्य ,कालवा निरीक्षक ,गणेश भुकेले ,जीवन वराट , डॉ.भगवान जाधव , हार्मोनियम वादक उत्तम नाना मोटे ,मृदंगचार्य बेद्रे , गायनाचार्य सर्वश्री इंद्रजित अण्णा येवले, बळीराम यादव, रामनाथ सालपे, ज्ञानेश्वर औटी, नाना कवडे, रामजी धोंडरे यांच्यासह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.






