बीड – गेवराई : सध्या कडक उन्हाचे दिवस असून, जनावरांना उन्हात बांधू नका, त्यांची काळजी घ्या, असे आवाहन पशू संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून वातावरण 41 अंशांवर गेल्याने, कडक उन्हाळा जाणवत आहे.
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, ५ लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (२५ ग्रॅम), थोडे मिठ (५जी१० ग्रॅम) आणि ५ ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे. असे आवाहन
प्रा.के.एल.जगताप.
विषय विशेषज्ञ
(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग)
कृषि विज्ञान केंद, खामगाव
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, यांनी केले आहे.