गेवराई – बीड : : माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन, माझ्या शेताचे कंपाऊंड तोडून अतिक्रमण करणाऱ्या शेतकर्यावर कडक कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा, अशी तक्रार बेबीबाई यशवंत बद्रे रा.उमापुर ता. गेवराई जि.बीड यांनी तहसीलदार गेवराई यांच्याकडे 8 एप्रिल 2025 रोजी लेखी निवेदन देऊन केली आहे.
दरम्यान, तहसील कार्यालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले असून, गोरगरीब महिलांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा सदरील महिलेने प्रशासनाकडे केली आहे.
या संदर्भात, बेबीबाई यशवंत बद्रे रा.उमापुर ता. गेवराई जि.बीड यांनी गेवराई तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
मौजे उमापुर ता. गेवराई येथील ग.नं. 1003 मधील माझ्या नावावर
3 हे. 21 आर जमीन असून, शेजारी असलेल्या शेतकर्याने
काही भागावर अतिक्रमण केले आहे. मौजे-उमापुर येथील ग.न. 1003 मध्ये 3 हे 21 आर. क्षेत्र मला वारसा हक्काने मिळालेले आहे. त्यामध्ये मी बाजरी, कापूस असे पिके घेत असते. परंतु ,मी पिंपरीचिंचवड ता. हवेली जि.पुणे येथे मागील एक वर्षापासुन राहत आहे. मी, आजारी असते. याचाच गैरफायदा घेवुन नवनाथ निवृत्ती मोरे रा.उमापुर ता.गेवराई यांनी लोखंडी खांब तोडुन विक्री केले आहेत. तसेच शेतातला मोठा बांध फोडून त्यामध्ये अंदाजें 0 हे. 25 आर जमीनीवर अतिक्रमण करुन त्यातील दगड, माती, आणि मुरुम जेसीबीने खोदकाम करुन विक्री केला आहे.
विशेष म्हणजे, मोजणीदाराने खुणा करून दिलेल्या माझ्या हद्दीत लोखंडी कंपाउड केलेले असताना, त्यांनी माझे कब्जातील – ताब्यातील जमिनेचे नुकसान केलेले आहे. माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन, माझ्या शेताचे कंपाऊंड तोडून अतिक्रमण करणाऱ्या शेतकर्यावर कडक कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा, अशी तक्रार बेबीबाई यशवंत बद्रे रा.उमापुर ता. गेवराई जि.बीड यांनी तहसीलदार गेवराई यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, तहसील कार्यालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले असून, गोरगरीब महिलांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करून, मला न्याय द्यावा अशी विनंती सदरील महिलेने प्रशासनाला केली आहे.






