गेवराई -बीड : उमापूर ता. गेवराई येथील संत नरहरी अर्बनच्या चेअरमन पदी सौ. संध्या कृष्णा शहाणे यांची निवड करण्यात आली असून, व्हा चेअरमन पदाची जबाबदारी रमेश चिंतामणी यांच्याकडे देण्यात आली आहे. दोन्ही निवडी सर्वानुमते बिनविरोध करण्यात आल्या आहेत. रविवार ता. 13 रोजी दु. दोन वाजता शांततेत निवडणुक प्रक्रिया पार पडली.
गेवराई तालुक्यातील उमापूर येथील संत नरहरी अर्बन को-ऑपरेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमन म्हणून सौ. संध्या कृष्णा शहाणे यांची निवड करण्यात आली. व्हा चेअरमन म्हणून रमेश चिंतामणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संचालक म्हणून दहिवाळ ज्ञानेश्वर, हावळे नारायण, उदावंत राजेश, शहाणे प्रवीण, सोलंकर आबासाहेब, कृष्णागंद खरात ,सरस्वती शहाणे भक्तराज औटे यांच्या निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागाचे अधिकारी मिलिंद देशपांडे यांनी काम पाहिले. सहकार अधिकारी एस.एम. बारगजे यांनी त्यांना सहकार्य केले. संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवडीबद्दल संस्थेचे खातेदार, ठेवीदार , हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.






