गेवराई – बीड : देवांश कार डेकोरच्या दुकानाला अचानक आग लागून, वीस लाखाचे नुकसान झाल्याची घटना रविवार ता. 13 रोजी मध्यरात्री घडली आहे. दरम्यान, शाॅक सर्किट होऊन, दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस, महसुल व विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जळीत दुकानाला भेटी देऊन, पंचनामा केला आहे.
गेवराई पासून जवळच असलेल्या, गेवराई – शहागड राष्ट्रीय महामार्गावर, खळेगाव ता. गेवराई जि.बीड येथील योगेश भारत शिंदे यांच्या मालकीचे
देवांश कार डेकोरचे [ पांढरवाडी फाटा ] दुकान आहे. रविवार ता. 13 रोजी मध्यरात्र शाॅक सर्किट होऊन, दुकानाला अचानक आग लागली. आगीत दुकानातील महागडे साऊंड सिस्टीम, इन्टेरिअर सिस्टम, कॅमेरे, चार चाकी वाहनाला लागणाऱ्या किमती वस्तू जळुन खाक झाल्या आहेत. दुकानाला आग लागल्याची माहिती उशिरा समजल्यावर अग्निशमन दलाने आग विझवली. रात्री नऊ ते दहाच्या आत दुकाना बंद करण्यात येतात. त्यामुळे, आगीची घटना लवकर समजली नाही.
आगीत जवळपास वीस लाखाचे योगेश नुकसान झाले असून, गेवराई पोलीस ठाण्याचे उगलमुगले, राठोड यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. गेवराई चे तलाठी पांढरे , विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाला भेट दिली आहे. शाॅक सर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाल्याने देवांश कार डेकोरचे मालक योगेश शिंदे यांना मानसिक धक्का बसला असून, त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते दिपक तात्या आतकरे, युवा नेते यशराज पंडित, बबलू खराडे, धर्मराज आहेर
यांनी ही दुकानाला भेटी देऊन, देवांश कार डेकोरचे मालक योगेश शिंदे यांना धीर दिला आहे.






