गेवराई – बीड :
गेवराई तालुक्यातील आगर नांदूर येथील शेतातून बैलजोडी चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी ता. 18 रोजी घडली आहे. बालाप्रसाद किसनलाल सोमानी या शेतकऱ्याच्या गट क्रमांक 263 मधील शेतामध्ये बांधलेली जवळपास 1 लाख रुपये किंमतीची बैलजोडी चोरांनी पळवून नेली आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेवराई तालुक्यातील आगर नांदूर शिवारात बालाप्रसाद किसनलाल सोमानी यांची गट नं.263 मध्ये शेती आहे. या शेतातील गोठ्यात बांधलेली बैलजोडी चोरीला गेल्यास परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान बालाप्रसाद सोमाणी यांनी पोसीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आगर नांदूर येथे मी माझे कुंटुबासह राहतो. मी शेतीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवितो माझ्याकडे आगार नांदूर शिवारात गट.नं. 263 मध्ये आठ एकर शेती आहे. शेतीच्या मशागतीसाठी माझ्याकडे बैलजोडी आहे. त्यांचेसाठी गट. नं. 263 मध्ये गोटा बांधलेला आहे. दि. 17/04/2025 रोजी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास मी माझे शेतातील गट नं 263 मध्ये असलेल्या गोठ्यावरून जनावरांना चारापाणी करून घरी आलो. दि.18/04/2025 रोजी सकाळी 7 वाजता शेतात गोठ्यावर जनावरांना चारापाणी करण्यासाठी गेलो असता गोठ्यामध्ये बैलजोडी दिसून आली नाही. त्यामुळे मी आजूबाजूला व इतर ठिकाणी बैलांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. दोन पांढऱ्या रंगाचे खिलार जातीचे उभे अर्धवट गोलाकार शिंगे असलेले बैल, असे चोरीला गेलेल्या बैलाचे वर्णन असल्याचे सोमानी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तरी हे दोन्ही बैल शेतातील गोठ्यातून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.






