गेवराई – बीड – मोटारसायकल विहिरीत पडलेली…विहिर टाॅप टू बाॅटम 84 फूट खोल..जवळपास तीस फुटांपर्यंत पाणी..पाण्यात पडलेल्या दुचाकीला काढायचे म्हणून दोन तरूण विहिरीत उतरले…त्यांना पोहता ही येत होते…मात्र, मोटारसायकल मध्ये असलेले पेट्रोल पाण्यात मिसळल्याने, पाण्यात व विहिरीत असलेल्या पोकळीत दुषित वातावरण निर्माण झाले..त्याचा अंदाज न आल्याने “ते” दोघेही गुदमरले..त्यांचा श्वास कोंडला…आणि त्यामध्येच त्या तरूणांचा मृत्यू झाला. अशी प्राथमिक चर्चा आहे. त्या दोघा तरूणांचा मृतदेह बाहेर काढण्याची जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या धाडसाने पार पाडली आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे व एका सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.
शुक्रवार ता. 23 मे. रोजी दु. 1 वाजता ते दोघे विहिरीत उतरले होते. मात्र, त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. 22 तासाच्या प्रयत्नानंतर, शनिवार ता. 24 रोजी सकाळी दहा वाजता दोन पोलीस कर्मचारी व एक सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने त्या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. सदरील विहिर 84 फूट खोल आहे. त्यामुळे, अडचणी येत होत्या.
पोलीसांनी दोन दिवस प्रयत्न करून, अखेर त्या दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. उमापूर-चकलांबा पोलीस ठाण्याचे कर्मचारी विनोद सुरवसे, के.एम. पवार, तसेच सामाजिक कार्यकर्ते रघू [भाऊ ] जाधव यांनी 84 फूट खोल विहिरीत जाऊन, मोहीम पार पाडली. चकलांबा पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहाय्याने त्या दोन्ही तरूणांचा मृतदेह बाहेर काढण्यात अखेर यश आले. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने 84 फूट खोल विहिरीत उतरून कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचारी विनोद सुरवसे, के.एम.पवार व सामाजिक कार्यकर्ते रघू चव्हाण यांचे उमापूर पंचक्रोशीतील नागरीकांनी कौतुक केले आहे. उमापूर येथील सरपंच किरण भैय्या आहेर यांनी ही पोलीसांना सहकार्य केले आहे. उमापूर व पंचक्रोशीतील कार्यकर्ते ही पोलीसांच्या मदतीला धावून आले होते. पोलीस उपनिरीक्षक पाटील यांची टीम दोन दिवसापासून घटनास्थळी ठाण मांडून होती. शुक्रवार ता. 23 रोजी घडलेल्या दुर्दैवी घडलेल्या घटनेतील, पाण्यात बुडालेले दोघा तरूणांचा मृतदेह
शनिवार ता. 24 रोजी सकाळी दहा वाजता विहिरीतून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर, पुढची दिशा लक्षात येणार आहे. या प्रकरणाचा तपास चकलांबा पोलीस करीत आहेत. नेमके हे प्रकरण काय आहे. या विषयी उलटसुलट चर्चा आहेत.






