गेवराई -बीड :
बंजारा समाजा सोबतच सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे, तळागाळातील लोकांचे प्रश्न आपल्या मनमिळाऊ स्वभावाने मार्गी लाऊन उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आदराने वागणूक देणारे, पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेऊन पक्षश्रेष्ठी च्या माध्यमातून पक्षाचे आचार विचार लोकांत रुजवून पक्षासाठी व समाजसेवेसाठी वेळ देणारे आण्णासाहेब राठोड यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड झाली असून या निवडीने त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होऊ लागले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बीड जिल्ह्यातील सर्व अकरा तालुका अध्यक्षांच्या नावांची घोषणा जाहीर केली. जिल्ह्याचे लोकप्रिय खा. बजरंग बाप्पा सोनवणे, आ. संदिप क्षीरसागर, माजी आमदार, जेष्ठ नेते मंडळी यांचेशी चर्चा करून निवडी करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे. राजेंद्र मस्के यांची जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांचेशी चर्चा करून राष्ट्रवादी भवन बीड येथे जिल्ह्याची व्यापक बैठक घेऊन जुनी कार्यकारिणी बरखास्तीची घोषणा केली होती. त्यानंतर जुन्या नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तालुका निहाय बैठका घेण्यात आल्या. प्रत्येकांशी संवाद साधण्यत आला. तालुका अध्यक्ष कसा असावा कोण असावा याबाबत अनेकांचे मत विचारात घेण्यात आले. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नवीन माणसं जोडणारा असावा. तालुक्यातील जनता व कार्यकर्त्यांना वेळ देणारा, सर्वांना सोबत घेऊन तालुकाभरात काम करणारा व्यक्तीची निवड करावी. अशी प्रतिक्रिया सामान्य कार्यकर्त्यां मधून आल्या नंतर गेवराई तालुक्याच्या बाबतीत हे सर्व गुण अण्णासाहेब राठोड यांच्यात असून लोकसभा निवडणुकीत खासदार बजरंग सोनवणे निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करून लोकसभेमध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा भरघोस लीड देऊन खासदार बजरंग सोनवणे यांना खासदार करण्यासाठी हातभार लावला विधानसभा निवडणूक मध्येही पक्षाने दिलेले आदेश व महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारासाठी तन-मन-धनाने काम केले या सर्व बाबीचा विचार करून जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्ष पदी अण्णासाहेब राठोड यांची नेमणूक केली व राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेब याचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्या साठी, सामान्य जनते सेवा आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वाना सोबत घेऊन ताकदीने काम करावे. अशी अपेक्षा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीने तालुका भरातून तालुकाध्यक्ष अण्णासाहेब राठोड यांचे स्वागत केले जात आहे.






