स्व. मुंडे साहेबांमुळे आमच्या कुटुंबाला राजकारणात मान सन्मान-बाळराजे पवारांनी गोपीनाथ गडाचे घेतले आशीर्वाद
गेवराई – बीड : : स्व. मुंडे साहेबांमुळे आमच्या कुटुंबाला आमदारकी मिळाली. त्यांनीच राजकारणात आणून, डोक्यावर हात ठेवला
आमच्या मध्ये एक वेगळ्या नात्याची वीण तयार झाली होती. ते ऋणानुबंध आज शब्दात सांगता येत नाहीत. अशी भावना व्यक्त करून, युवा नेते बाळराजे पवार यांनी
लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेवराईचे गोपीनाथ गडावर जाऊन अभिवादन केले.
स्व.गोपीनाथरावजी मुंडेच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी, आपल्या भावना व्यक्त करतांना बाळराजे पवार यांनी लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीना उजाळा देतांना ते म्हणाले की, 2013 साली स्व.गोपीनाथ मुंडे यांनीच
आमच्या कुटुंबाना गेवराईच्या राजकारणात सक्रिय केले. भारतीय जनता पक्षाकडुन माझे बंधू लक्ष्मण पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली. आशीर्वाद देऊन निवडून आणले. आमदार केले.
आमच्या सारख्या राजकारणातून बाजुला गेलेल्या अनेक कुटुंबातील लोकांना स्व.गोपीनाथ मुंडेनी सत्तेत आणण्याचे काम केले आहे. आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा इमानदारीने प्रयत्न केला आहे. असे सांगून, बाळराजे पवार म्हणाले,
स्व.गोपीनाथ मुंडे ही व्यक्ती नसुन एक विचार आहे. तोच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहुत, अशा भावना व्यक्त बाळराजे पवार यांनी स्व.गोपीनाथ मुंडेना अभिवादन केले आहे
यावेळेस संतोष हागे, प्रमोद मोटे,ईश्वर पवार, कृष्णा ढाकणे, लक्ष्मण मुंडे, प्रशांत राख, संतोष वनवे, विष्णुपंत आतकरे, बाळासाहेब उबाळे,श्रिराम घाटुळ,संतोष राठोड, प्रकाश गाडे,आदि उपस्थित होते






