स्थानिक पातळीवरच्या राजकारणात गाव खेड्यांच्या विकासात अडथळे आले. भावकी-जावकी, गटा – तटाने कर्तृत्व सिद्ध करू शकणार्या माणसां पासून ग्रामपंचायती दूर राहील्या. पाणी आडवा, पाणी जिरवा. या योजनेचा विपर्यास करून, गाव पुढाऱ्यांनी एकमेकांच्या जिरवा – जिरवीत गावाला अवकळा आणली. कोणी किती ही, नाकारले तरी, हे कटू सत्य आहे. मात्र,
काळ बदलला. तसा विचार ही बदलू लागला. शिकली – सवरलेली चांगली पिढी गावच्या विकासाचा विचार करू लागली. एज्युकेटेड तरूणांच्या हाती गावचा कारभार दिला जाऊ लागला. गाव विकासाच्या दृष्टिकोनातून हे चांगले चिन्ह होते. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, जाती पेक्षा कर्तृत्व मोठे असते. या अर्थाने उशिरा का होईना, लोक शाश्वत सत्याचा शोध घेऊ लागलेत.
असाच एक ध्येयापर्यंत जाऊ पहाणारा तरूण कार्यकर्ता आहे. ज्यांनी वडलांच्या सरळ साध्या – प्रतिमेचा आधार घेत, स्वतःची ओळख निर्माण केली. अवघ्या तेविसाव्या वर्षी गावचे कारभारी झाले. संधी मिळाली. त्या संधीचे सोने केले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना, गावाला दुजाभाव न करता वेळ दिला. निवडणूकी पुरते राजकारण केले. गावातून सूर उमटले, सरपंच आपला माणूस..!
सलग दुसरी इनिंग सुद्धा सहज खांद्यावर घेतली आहे. तिरंगी लढतीत जनतेने, इथे “बाबर” राज्य करतील, असा निर्णायक कौल दिला. रोहीतळची माणसं खूप साधी-भोळी आहेत. एकदा विश्वास टाकला की, मागे हटत नाहीत.
गावकरी मनाने दिलदार आहेत. पहिल्यांदा मुकुंद यांना सरपंच पदाची संधी दिली. दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या पत्नीवर जबाबदारी टाकली. नऊ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. लोकसंख्या चार पाच हजाराच्या घरात आहे.
दोन हजार मते आहेत. त्यापैकी, एकट्या मुकुंदाच्या पारड्यात सोळाशे-सतराशे मते पडतात. एका तरूणावर टाकलेला विश्वास मोठी गोष्ट आहे. त्या विश्वासाला ते पात्र राहीलेत.
अवघ्या 23 व्या वर्षी गावचा कारभारी होता येणे, ही बाब साधी नाही. ग्रामपंचायत म्हणजे, अवघड वाट आहे. काहींना वाटायचे, शहरातून आलेला एक नवखा तरूण काय करीन ? वयोवृद्धांना आशेचा किरण दिसायचा. भाऊचा [ बाबासाहेब बाबर ] पोरगा बरा वाटतोय. तरूण आहे. धरपड्या आहे. एवढ्या दिवसात किती आले, किती गेली. आणखी पाच वर्ष गेले म्हणून समजा. नवख्या मुकुंदाने जिद्द ठेवली. जबाबदारी पार पाडली.
रोहीतळ ग्रामपंचायतीचे रूपडे पालटू लागले आहे. एका विश्वासाला बळ मिळाले आहे.
रोहीतळ ता. गेवराई जि.बीड हे गाव गेवराई शहरापासून पूर्वेकडील गेवराई- जातेगाव राज्य रस्त्यावर आहे. गावात जायच्या आधी फुलांचा ढिग जागो, जागी दिसायचा. त्याचा दूरवर वास यायचा. लक्षात यायचं गाव आलय गड्या..! छोटी पण मोठी समस्या होती. गावाला विश्वासात घेऊन काम करणे अवघड असते.पण, थांबायचे नाही. गावाला सोबत घेऊन काम करायचे. मागे हटायचे नाही. निर्धार करून पुढे जायचा निर्णय घेतला आणि सुरू झाला स्वच्छ, सुंदर गावासाठीचा लढा..!अवघ्या 23 व्या वर्षी मुकुंद बाबर सरपंच पदावर मोठ्या मताने निवडून आले. राजकीय पटलावर अत्यंत महत्त्वाचे गाव म्हणून, रोहीतळ गावाची ओळख आहे.
बाबर यांचे वडील बाबासाहेब बाबर माजी राज्यमंत्री बदामराव [ भाऊ ] पंडित यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करायचे. मात्र, गावचा कारभार त्यांच्या हाती आला नाही. मात्र, भाऊच्या प्रतिमेचा त्यांना फायदा झाला. सगळ्यांशी खुशीलीने वागून, त्यांनी गावपण सांभाळले. बाबर कुटुंबाची गावात एक दोन घरे आहेत. मुकुंद बाबर यांनी स्वतःच्या स्वकर्तृत्वावर गावाला आपलेसे केले. पहिल्याच टर्म मध्ये गाव विकासाची लहान – मोठी कामे ध्यानात घेऊन, लक्ष केन्द्रित केले. गोरगरीब घटकांपर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला. या योजनेत केवळ कागदपत्र घेतली. शेवटपर्यंत फाईलचा पाठपुरावा केला. एक नवा पैसा न घेता, घरकुल योजना लाभार्थ्यां पर्यन्त शस्वीपणे राबविली आहेत. पंचक्रोशीत विहिरीच्या माध्यमातून सिंचन, गावात सिमेंट, पेव्हर ब्लॉक चे चकाचक रस्ते. वृक्षारोपण, अंडरग्राऊंड नाली, पाणी आहे. शाळेकडे लक्ष दिले.
जल जिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर आहे. गावात प्रवेश करतानाची भव्य अशी वेस उभी केली आहे. अशी, अनेक विकासाची चांगली कामे पूर्ण केली आहेत.
मुकुंद बाबर यांना सामाजिक- राजकीय चळवळीत चांगली माणसे भेटत गेली. निर्व्यसनी असल्याचा त्यांना फायदाच झाला. बीड जिल्ह्य़ातील राजकीय नेत्यांशी त्यांचे काॅन्टॅक वाढत गेले. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचा एक तरूण विश्वासू कार्यकर्ता म्हणून, बाबर यांची ओळख झाली. शहरात काम करताना त्या ओळखीचा उपयोग होत गेला. पंचायत समिती, सरकारी दवाखाना अशा वर्दळीच्या ठिकाणी गावच्या माणसांना सहकार्य करता आले.
सरपंच पद आणि गावगाडा, या विषयावर
मुकुंद बाबर यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले ; गावकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केलय. लपाछपी नाही. दिलेला शब्द पाळायचा प्रयत्न केला. वेळ काढूपणा केला नाही. लावा – लावी केली नाही. गावाने सहमती दिल्याशिवाय काही केले नाही. जवळपास चार कोटी रूपयाची जल जिवन मिशन पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर आहे. पाईप क्वॉलिटीचे [ दर्जेदार ] आणलेत. गावाला सोबत घेतले. गाव अंतर्गत पाणंद रस्त्याचा प्रश्न होता. तो ही निकाली काढला. आपलाच रस्ता, आपलेच शेत. दहा,अकरा मोठ-मोठे पाणंद रस्ते तयार करून घेतले. हे रस्ते एकमेकांना जोडल्याने, त्याचे चांगले परिणाम दिसून आलेत. लोक खुश आहेत. ते म्हणाले की, मला कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नाही. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय. गेवराई च्या [ जि.बीड बीड ] आर. बी. अट्टल काॅलेजात असताना कष्टाची कामे करून शिकलो. त्यामुळे, सामाजिक भान ठेवून काम करतोय. गावाने एवढा विश्वास दाखवला. त्यांचे खूप मोठे उपकार आहेत. त्या उपकाराची परतफेड शक्य नाही. मात्र, इथल्या मातीशी, गावकऱ्यांशी जोडून रहा, एवढीच एक अपेक्षा वडलांनी ठेवली होती. तुला राजकारण करायचे, हरकत नाही. पण, गाव नावे ठेवीन, अस काही करू नको.
पहिली पाच वर्ष जनतेने पाहिली आहेत. त्या बळावर दुसर्यांदा संधी मिळाली. माझी पत्नी समृद्धी मुकुंद बाबर-वांढरे , गावच्या कारभारात लक्ष देते.
महिलांशी संवाद साधून, समस्या जाणून घेते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला एकत्र येतात. त्यांचा पाठिंबा आहे. म्हणूनच, गावासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न केला. फार काही केलय,असा माझा दावा नाही. परंतू , गाव हिताच्या चार गोष्टी नक्कीच पूर्ण करू शकलो. 2016 पासून गावाने डोक्यावर हात ठेवलाय. याचे, नक्कीच मोठे समाधान आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणायचे, बहुजन मैत्री दे रे राम..! या अर्थाने, मुकुंदराव तुम्ही खरच नशीबवान आहात. गावाने अंतर न देता तुम्हाला सांभाळून घेतले आहे. त्यांची आब राखा, मळभ येऊ न देता गोरगरीब घटकांसाठी काम करा. आपणास आभाळभर शुभेच्छा..!
सुभाष सुतार, पत्रकार
गेवराई-बीड






