गेवराई – बीड : गेवराई शहरात बुधवार ता. 11 रोजी दुपारी चार वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. झालेल्या पावसाने शहरात पाणीच पाणी झाले असून, आजूबाजूच्या परिसरात ही पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची गरज होती. पडलेल्या पावसाने समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान,
मे महिन्यात सलग पंधरा दिवस पावसाने राज्यात धुमाकूळ घातला होता. बे – मोसमी पाऊस झाल्याने नदी ,नाले ,ओढे, धरणे,ओसंडून वाहत होते. मात्र, जून च्या पहिल्याच आठवडय़ात पाऊस गायब झाला होता. बे-मोसमी पावसात अनेक ठिकणी पेरण्या झाल्यात. त्यामुळे, पावसाची गरज होती. बुधवार ता. 11 रोजी दुपारी पावसाला सुरुवात झाली. पूर्वेकडून ढग दाटून आले होते. वारा शांत होता. काही क्षणातच पावसाने हजेरी लावली. गेवराई तालुक्यातील विविध भागात पाऊस सुरू असल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्य़ात पावसाचे आगमन झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. बे-मोसमात पेरणी केलेल्या शेतकर्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. उमापूर, चकलांबा परिसरात पावसाचा थेंब पडला नाही. अर्ध्या तालुक्यात पाऊस आहे.






