अहमदाबाद – गुजरात :
गुजरातमध्ये विमान कोसळल्याची घटना गुरूवार ता. 12 रोजी दुपारी दोन वाजता घडली आहे. विमानाने टेक ऑफ करताच, अवघ्या काही सेंकदात विमानाला भिषण अपघात झाला. विमानात भारतीय प्रवाशांसह विविध देशाच प्रवाशी होते. एक व्यक्ती जिवंत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. विमानात बिघाड झाल्याचे, वैमानिकाच्या लगेच लक्षात आले होते. मात्र, वेळ मिळाला नाही. तसा मेसेज जगभरातील विमानतळ विभागाला पाठवला होता. दरम्यान,
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रूपाणी याच विमानात बसून प्रवास करत होते. त्यांचा ही, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. विमान 625 फुटावरून इमारतीवर कोसळले आहे. रमेश विश्वासकुमार हा प्रवाशी वाचला आहे.
हे विमान अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानीनगर या रहिवाशी भागात कोसळलं आहे. या घटनेत 204 लोकांचे प्राण गेले आहेत. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी 41 जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या अपघातात कोणी ही वाचले नाही. विमानातील 242 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भिती असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेने दिली आहे.
हे विमान एअर इंडियाचे Flight AI171 होते. उड्डाणानंतर लगेचच अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 242 प्रवाशांसह हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होते. या अपघातस्थळी अग्निशमन दलाची वाहनं, पोलीस तसेच मदतकार्य करणारी पथकं कार्यरत झाली असून गुजरात सरकार आणि केंद्र सरकार मदतकार्य करत आहेत.
हे विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
एका व्यक्तीनं सांगितले की,
घटनेनंतर सर्वत्र आगीचे लोळ, काळाधूर पसरल्याने धावपळ उडाली. तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळाकडे धावल्या. प्रवाशांच्या देहाचे तुकडे पडले होते. मेडिकल विद्यार्थ्यांच्या वसतिगृहालाही धक्का बसला आहे.






