गेवराई : बीड – गेवराई पंचायत समिती कार्यालयातील, स्वच्छ भारत अभियान विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ; सोमवार ता. 16 रोजी दुपारी
कारवाई केली आहे. या कारवाईने पंचायत समिती परिसरात खळबळ उडाली आहे. घटना घडताच, पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयातून निघून गेले. दरम्यान , गेवराई पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराने कळस गाठला असून, आणखी काही अधिकारी, कर्मचाऱ्यारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडावर असल्याची चर्चा आहे.
गेवराई पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छता अभियान विभागात एका व्यक्तीचे काम करण्यास टाळाटाळ केली जात होती. संबंधित कर्मचारी यांनी
चव्हाण तक्रारदाराकडे पैशाची मागणी केली. त्या संदर्भाने सोमवार ता. 16 रोजी दु. 2 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचायत समिती कार्यालयात सापळा रचून कारवाई केली आहे. घटना घडताच, पंचायत समिती परिसरात
एकच गोंधळ उडाला. काय झाले, हेच लवकर कळाले नाही. कार्यालयीन कामाचा पहिलाच दिवस असल्याने पंचायत समिती परिसरात गर्दी होती. स्वच्छ भारत अभियान विभागात बसलेल्या चव्हाण यांच्यावर कारवाई झाल्याचे समाजात, अन्य कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयातून काढता पाय घेतला. दरम्यान, पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी विलास चव्हाण यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा आहे. अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तक्रार काय आहे. तक्रार कोणी केली. या संदर्भात उलटसुलट चर्चा आहे. अन्य काही भ्रष्ट अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडावर असल्याची माहिती आहे.






