अकोले – अहिल्यानगर : गोरगरीब घटकांपर्यंत आर्थिक उन्नती घडवून आणण्यासाठी सहकार क्षेत्र आवश्यक आहे. संस्थेच्या माध्यमातून सहकार्य, विश्वास आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करून सर्वांगीण विकास साध्य होईल. असा दृढ विश्वास हभप दिपक महाराज देशमुख यांनी येथे बोलताना केले.
सहकार क्षेत्रात समाजाभिमुख सेवा देऊन , विश्वासार्हता निर्माण करणाऱ्या सहयोग मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या अकोले येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा सोमवार, दि. 16 जून 2025 रोजी सकाळी दहा वाजता उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर हभप रमेश भोरे ,धामणगाव पाट, ह.भ.प. चंद्रकांत चौधरी सरस्वती विद्यालय, अकोले, यांची उपस्थिती होती. हभप देशमुख महाराज म्हणाले की,
सहकार्य, विश्वास आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करून सर्वांगीण विकास साध्य करता येतो. ग्राहकांना चांगली सेवा दिली पाहिजे. ठेवीदारांचा विश्वास मिळवला पाहिजे आणि बॅन्केने दिलेले कर्ज वेळेत दिले पाहिजे. सहकार क्षेत्र एकमेकांवर अवलंबून आहे. सहयोग मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीचा आलेख निश्चित कौतुकास्पद आहे. या परिसरातील नागरिक बॅन्केला मदत करतील आणि बॅन्क त्यांच्या विश्वासाला पात्र राहील. असा विश्वास दिपक महाराज देशमुख यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला आहे.
कार्यक्रमास स्थानिक शेतकरी बंधू, व्यापारी, शिक्षक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक एकात्मता आणि आर्थिक प्रबोधन यांचे दर्शन घडवले आहे.
दिगंबर सुखदेव टेकाळे (चेअरमन, सहयोग मल्टीस्टेट), सहकारी संचालक मंडळाने उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. चेअरमन टेकाळे म्हणाले की,
संस्थेच्या माध्यमातून गावोगावी पारदर्शक कारभार करून, सेवा करण्याचा प्रयत्न राहील. होतकरू तरूणांना कर्ज, ग्राहक व ठेवीदारांचा विश्वास संपादन करून, बॅन्केचे प्रशासन इमानदारीने सहकार क्षेत्रात समाजाभिमुख काम करण्यास कटिबद्ध आहोत. सहकार क्षेत्रात ग्राहकांचा, ठेवीदारांचा आणि गावातील जनतेच्या
विश्वासावर आमची वाटचाल राहील. असे विचार बॅन्केचे चेअरमन दिगंबर टेकाळे यांनी व्यक्त केला.






