माजलगाव -बीड – तुमची विहिर मंजूर करण्यात आली असून, त्या बदल्यात पैशाची मागणी करणारा एक सरपंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. सदरील घटना शुक्रवार ता. 20 रोजी
किट्टी अडगाव ता. माजलगाव येथे घडल्याची माहिती समोर येत असून,या घटनेने खळबळ उडाली आहे. विहिरीच्या प्रकरणात मदत करतो. पुढचे सगळे करायला माझीच गरज लागणार आहे. त्यामुळे, सदरील सरपंचाने पैसे मागितले. त्या मध्ये तो अडकला असल्याची चर्चा आहे.






