गेवराई – बीड : पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने, मानवा पुढे भविष्यात अडचणी उभ्या राहतील. हे टाळायचे असेल तर, वेगाने वाढणाऱ्या झाडांचे संवर्धन करण्याची गरज आहे. बांबु लागवडीच्या माध्यमातून ग्रीन बेल्ट तयार करून, या चळवळीला तरूण शेतकर्यांनी व्यापक स्वरूप प्राप्त करून द्यावे. असे, आवाहन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, माजी आमदार पाशा भाई पटेल यांनी येथे लोकसंवाद पोर्टल च्या बातमीदाराशी

बोलताना केले आहे. दरम्यान, बीड जिल्ह्याला मोठा गोदा काठ लाभलेला असून, त्या पट्टय़ात बांबू लागवडीला मोठी संधी असल्याचे निरिक्षण ही त्यांनी नांदविले आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा जय भवानी बॅन्केचे व्हा. चेअरमन स्व. बालाप्रसाद लोया यांच्या निवासस्थानी, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी, शनिवार ता. 21 रोजी सकाळी अकरा वाजता
सांत्वनपर भेट दिली. बालाभाऊ लोया यांनी शेतकरी आंदोलनाच्या चळवळीत माझ्या सोबत काम केले. समाजा विषयी कळवळा असलेला एक सहकारी गेल्याचे सांगून, त्यांनी आठवणींना उजाळा दिला.
त्यानंतर, पाशा पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधून, बांबू शेती लागवडीच्या लागवडीच्या संदर्भात भाष्य केले. वातावरणात प्रतिकूल बदल होऊ लागलेत. त्याचे दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहेत. कार्बन च्या वाढत्या प्रमाणामुळे ऑक्सिजनच अडचणीत आला आहे. ही चिंतेची बाब असून, नव्या पिढीच्या भविष्यासाठी झाडांचे संवर्धन आवश्यक आहे. बांबू शेती हा अंत्यत महत्त्वाचा आणि शेतकर्यांच्या हिताचा विषय आहे.
बांबूची शेती करण्यासाठी सरकार मदत करायला तयार आहे. शेतकरी बांबू शेती कडे वळला पाहिजे. त्यातून,
शेतकर्यांना आर्थिक सुबत्ता येईल आणि पर्यावरण संवर्धन करता येईल. त्यासाठी, बांबू शेतीच्या लागवडीची आवश्यकता आहे. बीड जिल्ह्य़ात मोठा गोदा काठ आहे. या परिसरात बांबू शेतीला चांगली संधी आहे. बांबू पासून अत्यावश्यक गोष्टी तयार होतात. इथेनाॅल, कपडे, इ. वस्तू बांबू पासून तयार करता येतील आणि कार्बनचे प्रमाण ही कमी होईल. दरम्यान, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने, मानवा पुढे भविष्यात अडचणी उभ्या राहतील. हे टाळायचे असेल तर, वेगाने वाढणाऱ्या झाडांचे संवर्धन करण्याची गरज आहे. बांबु लागवडीच्या माध्यमातून ग्रीन बेल्ट तयार व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या चळवळीला तरूण शेतकर्यांनी व्यापक स्वरूप प्राप्त करून द्यावे. असे, आवाहन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, माजी आमदार पाशा भाई पटेल यांनी शेवटी बोलताना केले आहे.







