त्यांना एकदा, दोनदा नव्हे तर, ठराविक कालावधीत तीन वेळा र्हृदयविकाराचा त्रास झाला. ते पुढे आणि काळ त्यांच्या मागे. काळाने पिच्छाच सोडला नाही. मात्र, ते ही एवढे हरहुन्नरी की, अखेर काळाने हसून माघार घेतली. मृत्युच्या दाढेतून सही सलामत बाहेर आले. त्याचं निरागस हास्य बहारदार आहे. ते, मितभाषी आहेत. फार आदळआपट न करता चालत राहतात. ना, कुणा विषयी राग, ना लोभ. राजकारणाची आवड म्हणून सरकारी नौकरी सोडली. होईल तेवढी जनसेवा केली.
तीस वर्ष झाली.
भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन, ते काम करताहेत. भाजपाच्या वर्तुळात त्यांना चाचा नावाने ओळख मिळाली आहे. भाजपाचे कारम निमंत्रण सदस्य आहेत. जिल्हा नियोजन मंडळावर काम केलय.
स्व. गोपीनाथराव मुंडे घराण्याशी ऋणानुबंध निर्माण करणाऱ्या शेख जमादार यांचा राजकीय पटलावरचा प्रवास, एक सच्चा कार्यकर्ता, या अर्थाने नवल वाटणारा आहे. मृत्युच्या दारातून सहीसलामत माघारी आलेल्या ज्येष्ठ नेते शेख जमादार यांची भेटी घेतली. विविध विषयांवर गप्पा गोष्टी झाल्या. सामाजिक, राजकीय जुन्या आठवणींचा इतिहास त्यांनी सहजपणे मांडला. तो शब्दबद्ध करता आला. या भल्या माणसा विषयी लिहिता आले. हा दुग्धशर्करा योग आहे.
शेख जमादार, मु.पो. गेवराई जि.बीड. येथील भूमिपुत्र आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने ते शहरात आले होते. ते चकलांबा [ ता. गेवराई जि.बीड ] सारख्या गावखेड्यातले. शिक्षण [ जुनी puc ] सुरू असताना नौकरी लागली. सुरूवातीपासून सामाजिक कार्याची आवड होती. नौकरी, सामाजिक कार्य आणि थेट राजकारणातला प्रवेश. असा, तीन टप्प्यांतल्या, अनुभवातून आलेला प्रवास आहे. कामगार संघटनेत सक्रिय सहभाग घेतल्याने, त्यांच्या नेतृत्व गुणांची ओळख झाली. समन्वय साधणारी त्यांची भूमिका संघटनेला बळ देणारी राहीली.
मध्यममार्ग काढण्याकडे त्यांचा कल राहीला आहे. त्यामुळे, राज्य पातळीवर नेतृत्व करायची संधी मिळाली.
जलसिंचन विभागात नौकरी लागली. नौकरी लागल्यावर लग्न झाले. धोंडराई ता. गेवराई जि.बीड येथील सबिया बेगम यांच्याशी विवाह झाला. एकाच तालुक्यातले दोन सधन कुटुंब पवित्र नात्यात बांधले गेले. दृष्ट लागावी, असे हे जमादार कुटुंब आहे. तीन मुले आहेत. एक डॉक्टर, दुसरा प्राध्यापक,तिसरा मुलगा माध्यमिक शिक्षक आहे.
गोरगरीब घटकांविषयी कणव असलेली ही साधी माणसे आहेत. शेख जमादार यांच्या सुस्वभावी व्यक्तिमत्त्वा मध्ये या कुटुंबाचा उत्कर्ष ठळकपणे जाणवतो.
कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. शासकीय सेवेत कार्यरत राहून, कामगार कर्मचाऱ्यांच्या हितासाठी “जमादारकी” केली. याच काळात, त्यांचे राजकीय नेत्यांशी ओळख झाली. जलसिंचन विभागात नौकरी होती. राज्य संघटनेचे नेतृत्व होते. त्यांनी राजकारणात यावे, अशी अपेक्षा स्व. गोपीनाथराव मुंढे यांनी केली. त्यांच्या आग्रहाखातर शेख जमादार यांनी नौकरीचा राजीनामा दिला. त्या नंतरच्या वर्ष-दोन वर्षात [ 1992 – 93 ] गेवराई जि.बीड च्या राजकारणात माजी मंत्री बदामराव पंडित [ आबा ] यांचा राजकीय पटलावर उदय झाला. योग असा की, शेख जमादार आणि आबांची चांगली मैत्री होती. सर्व पक्षीय उमेदवार म्हणून आबा मोठ्या मताने विधानसभेत [ 1995 ] निवडून गेले. त्या दहा बारा-वर्षाच्या कार्यकाळात जमादार हे, माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या विश्वासातल्या मोजक्या कार्यकर्त्या पैकी एक होते.
जमादार चाचा यांचा, राजकीय व्यासपीठावर जो वावर झालाय. त्या 30 वर्षाच्या कालखंडात त्यांनी भारतीय जनता पक्षात इमानदारीने काम केले. कायम निमंत्रित सदस्य म्हणून त्यांची पक्षात नोंद आहे. त्यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांची साथ कधीच सोडली नाही. त्यामुळे, ते मुंडे घराण्याचे पाईक होऊन राहीलेत. एक अल्पसंख्यांक समाजाचा कार्यकर्ता गेवराई मतदारसंघात, स्व. मुंडे यांचा पाठिराखा होऊन राहतो. ही, त्या अर्थाने इतिहासात नोंद करणारी गोष्ट आहे. अनेकजण मुंडे साहेबांच्या पक्षात आले, गेले. जे येतील त्यांचे इमानदारीने काम करायची भूमिका जमादारांनी पार पाडली. पण, जिथे मुंढे तिथे जमादार, हे समीकरण कायम राहीले. शेख जमादार, मितभाषी माणूस आहे. अनाठायी बोलणे ,तोंड देखलेपणा करणे, त्यांना जमले नाही. राजकारणाचे डावपेच करून ते कधी वावरले नाहीत. मुंडे घराण्याची ज्यांना, ज्यांना मदत होईल, त्या सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यात, त्यांनी कुठे ही कसर ठेवली नाही. स्वाभीमानाने काम करायचे. कुणाच्या नादाला लागायचे नाही. एक नाम केशव, या धाटणीतला त्यांचा स्वभाव आहे. राजकारणात अनेक अडचणी आल्या. त्यांनी, त्या सहजपणे पचवल्या. कुणाकडे ही, तक्रार केली नाही. लेकिन, नबीने [ इश्वराने ]उनको हमेशा आशीर्वाद दिया है…! याच बळावर ते चालत राहीले. त्यांचा उत्कर्ष झाला. या वैखरीच्या वाटेवर,
पत्नी म्हणून धोंडराई च्या लेकीने खंबीर साथ दिली. बर्या-वाईट आयुष्यात सबिया बेगम, या माऊलीने दिलेल्या पाठिंब्यावर जमादार यांचा संसार सुखाचा झालाय. संसार वेल मांडवावर गेला. त्यांना तीन मुले आहेत. तिघे ही शासन सेवेत आहेत. मुलां -बाळांचा उत्कर्ष, हेच आई-वडीलांचे स्वप्न असते. मुलांचा ही, समाजकार्यात सहभाग असतो. त्यांच्या संदर्भातली एक आठवण आहे. मला आणि पत्रकार अमोल वैद्य यांना दिल्लीला जायचे होते. सदरील विषय शेख जमादार यांना सांगितला. त्यांनी, खा. गोपीनाथराव मुंडे यांचे पत्र दिले. दिल्लीतल्या निवासस्थानी फोन केला. त्या पत्रावर, आम्हाला आठ दिवस मुंडे साहेबांच्या बंगल्यावर राहता आले होते.
चळवळीतले कार्यकर्ते स्वाभीमानी असतात. इमानदारीने काम करतात. मात्र, जी-हुजूरी नको वाटते. पक्ष, संघटनेत काम करताना मूल्य सांभाळून काम करायचा प्रयत्न असतो.पुढाऱ्यांना वाटते, मी पक्ष सोडला की, कार्यकर्त्यांनी सुद्धा माझ्याच मागे आले पाहिजे. ही अपेक्षा रास्त ही असू शकेल. मात्र, कार्यकर्त्यांना ही मते असतात. भावना असतात. याकडे, पुढाऱ्यांचे लक्ष जात नाही. एका अर्थाने, हा रातांधळेपणा असतो.
जमादार यांनी मुंडे घराण्याशी निष्ठा ठेवली. या संदर्भात ते सांगतात, पक्षाचे काम करून, मुंडे साहेबांशी कनेक्ट राहीलो. त्यांची साथ कधीच सोडली नाही. साहेबांनी खूप जीव लावला. जिल्हा परिषदेचे तिकीट दिले. मात्र, निवडून आलो नाही. चार सोबत्यांना घेऊन लढलोत. केवळ, मुंडे साहेबांचे नाव घेऊन मते मागितली. साहेब, अकाली गेल्याचे दु:ख आहे. ते शब्दात सांगू शकत नाही. एवढे बोलून, जमादार यांनी खोलवर श्वास घेतला. त्यांनी अश्रुंना वाट करून दिली.
साहेब गेल्यावर पंकजाताईने पक्ष संघटनेत सक्रिय काम करायला संधी दिली. दोन्ही ताईंनी अंतर न देता, पाठिवर हात ठेवला. गोरगरीब घटकांच्या कामाला प्राधान्य दिले. त्या कालखंडात , 83 लोकांच्या हार्ट च्या ऑपरेशन साठी तत्कालीन खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी केवळ पत्र न देता, त्याचा पाठपुरावा केला. ताई मुळे आठ वर्ष जिल्हा नियोजन मंडळावर काम करता आले. मिनी मंत्रालय म्हणून नियोजन मंडळाकडे पाहिले जाते. तिथे संधी दिली.
आणखी काय पाहिजे. मुंडे साहेबांनी शैक्षणिक संस्था उभा करून दिली. संस्थेचा संस्थापक अध्यक्ष होता आले. या माध्यमातून, गेवराई मतदारसंघातल्या सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देता आली. समाजासाठी काही तरी करता आले आहे. या गोष्टीचे मनस्वी समाधान आहे. मुंडे घराण्याने सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख जमादार यांनी केला. स्व. मुंडे साहेबांच्या असंख्य आठवणींना उजाळा दिला.
प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, ज्यांच्या आयुष्यात श्रद्धेला महत्त्व असते. अशी माणसे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा उज्वल भवितव्याची स्वप्ने पाहतात. या अर्थाने, शेख जमादार यांनी जिद्द, चिकाटी, निष्ठा ठेवून काम केलय. त्यामुळे, त्यांना प्रगतीचे पंख लाभले. इश्वर [अल्लाह ] कृपीने त्यांची वाटचाल यशस्वी झाली आहे. त्यांना पुण्य लाभले आहे. तीन वेळा मृत्युला हुलकावणी देणारे शेख जमादार खरच नशीबवान आहेत. खलील जिब्रान यांनी लिहिलय, महत्त्वाकांक्षी माणसांना दीर्घायुष्य लाभते. जमादार चाचांना दीर्घायुष्य लाभो.
सुभाष सुतार, पत्रकार
गेवराई – बीड