यवतमाळ : वैशाली मंडवार :
आर्णी येथील बाबा कमल पोस्ट उर्दू माध्यमिक विद्यालयात मानस विकास मिशनच्या वतीने, विविध शाळेतील गरजू असलेल्या 17 मुलींना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, आयडियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सय्यद मकसूद अली पटेल यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून आर्णी सायकलिंग क्लबचे संस्थापक हरिओम सिंग बघेल, राजेश श्रीवास, मिर्झा परवेज बेग , सलीम तगाले आदी उपस्थित होते. यावेळी
हरिओम सिंग बघेल यांनी आपली
भावना व्यक्त केली. ते म्हणाले, गोरगरीब समाजातील घटकांना सायकल चे वाटप करून, आपण आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. आपण, समाजाचे काही तरी देणे लागतो. म्हणून, असे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले पाहिजेत. आयडियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
मकसूद शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करत आहे. त्यांचा आदर्श अन्य सामाजिक संस्थानी घ्यावा, असे आवाहन ही बघेल यांनी केले.






