गेवराई : बीड : तालुक्यातील उक्कड्पिंप्री येथे मंडळ कृषी अधिकारी – केसभट व माधुरी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रॉपसॅप संलग्न शेती शाळा दि. 2 जुलै 2025 रोजी कापूस शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेची सुरुवात सर्वप्रथम स्वागत व शेती शाळा प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. पीक परिसंस्था निरीक्षणे व कीटकनाशक संग्रहालय तयार करणे याबाबत चर्चा करण्यात आली. पीक परिसंस्था निरीक्षणे चित्रीकरण सादरीकरण व चर्चा करण्यात आली समूह कुरदर्श व अल्पोहार व विशेष अभ्यास लघु अभ्यास लघु प्रयोग व मूल्यमापन असे सर्व प्रकारचे प्रयोग घेण्यात आले सदरील शेती शाळेत समूह गुणदर्शन म्हणजे विविध मनोरंजनात्मक सांघिक खेळ शेतीशाळाचा समूह गुणदर्शनाचे अतिशय महत्त्व आहे व गट क्रियाशील व एकजूट राहण्याचे त्यांचा उपयोग होतो व शेतीशाळेत कपाशी पिकावर सध्या मावा किडीचा व रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्याकरिता ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी शेतकरी बांधवांनी करावी. – आर्थिक नुकसान पातळीच्या वर किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास फ्लोनिकॅ मीड ५० डब्ल्यू. जी. ४ ग्रॅम किंवा एसिटामिप्रीड २० डब्ल्यू. पी. २ ग्रॅम यापैकी कुठलेही एक कीडनाशक प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
सोबत निंबोळी अर्क मिसळल्यास उत्तम परिणाम मिळतील. कपाशीवरील बोंड अळ्या, भाजीपाला व फळपिके यातील विविध अळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता दशपर्णी अर्क अत्यंत फायदेशीर आहे. शेतीशाळेमध्ये दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क यांचा फवारणी मध्ये वापर करावा याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. तसेच पक्षांना कपाशीच्या शेतात बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे उभे करावेत म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळ्या टिपून खातील असे
मार्गदर्शन उप कृषी अधिकारी एस एस देशमुख व आर आर चव्हाण( मास्टर ट्रेनर) यांनी केले. सदर शेतीशाळे सविस्तर चर्चा करून पुढील शेती शाळे साठी सर्वांनी उपस्थित राहण्या बाबत सहाय्यक कृषी अधिकारी एम आय शेख यांनी आवाहन करून आयसीएम टाळीद्वारे शेती शाळेचा समारोप करण्यात आला सदरील शेती शाळेत उपस्थित सहाय्यक कृषी अधिकारी बी आर मोहोळकर आर के मेत्रे केके पवार, वंदना शिंदे, आनंद पक्षे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. शेती शाळेत उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ
प्रभाकर बांगर बाळासाहेब बांगर भगवान बांगर मुरलीधर पालवे रामकिसन , अभिषेक बांगर ,अल्ताफ शेख ,गणेश बांगर ,बळीराम क्षीरसागर ,अशोक आंधळे ,जगन्नाथ नागरगोजे ,रमेश जोगदंड ,विशाल लाकुठे ,चंद्रकांत बांगर ,विष्णू बांगर, राजेंद्र विघ्ने, सत्यवान लाकोटे, बजरंग बोबडे, भरत कुटे ,प्रदीप कुटे ,अशोक कुटे ,परमेश्वर पवार, नामदेव कुटे ,प्रकाश बांगर ,गजानन बांगर, गोपीनाथ बांगर, अजय मिसाळ ,रामचंद्र आहेर, शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.






