महाराष्ट्र राज्यातील अनेक वर्षांपासूनच्या परंपरेनुसार,आषाढी एकादशीच्या महापूजेचा सपत्नीक मान , राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो आणि मग, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मी मागील वर्षी देवाभाऊ सोबतच्या त्या गोड आठवणीत रमलो…
त्या भेटीवेळी मी नकळत बोललो होतो “भाऊ” पुढील वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाच्या महापूजेचा शासकीय माण हा तुम्हालाच मिळणार कारण आम्हा सर्वांना खात्री होती पंढरीचा विठुराया भाऊंनाच जुलै २०२५ रोजी पंढरपूर ला महापुजेसाठी बोलावणारच..!
राज्याचे मुख्यमंत्री तथा माझ्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान मा.देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्यासोबत अनेकदा भेटीचा योग आला आहे मा.भाऊंची सदिच्छा भेट म्हणजे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करतानां एक अमर्याद उर्जा मिळवण्याचं माध्यम असत कधी गुलाबाचं फूल,कधी गुच्छ (बुके) घेऊन भाऊंची भेट घेण्याचा योग आला पण मागील वर्षी भेटीवेळी,मनात काही वेगळंच घडत होत मा.भाऊंची भेट घेतांना मी विचार करत होतो यावेळी भेटीसाठी काय घ्यावं? गुलाबाचं फूल? बुके? की फोटो फ्रेम?
तेवढ्यात आठवल पुढील वर्षी तर आषाढी एकादशी आहे! आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान यंदा सपत्नीक देवाभाऊंनाच मिळणार हे मनोमन ठरवलं होतं…!
म्हणूनच मी विठ्ठल-रुक्मिणी मातेची एक सुंदर मूर्ती घेऊन भाऊंची सदिच्छा भेट घेतली त्या वेळी मी भावनेनं बोलून गेलो “भाऊ” पुढील वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाच्या महापूजेचा माण तुम्हालाच मिळणार ! आणि झालंही तसंच! २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं विशेषतः लाडक्या बहिणींनी आणि सामान्य मतदारराजान आपल्या हक्काच्या मुख्यमंत्र्याला, देवाभाऊंना, भरभरून मतदानरुपी आशीर्वाद दिला आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं.
साक्षात विठ्ठल-रुक्मिणी मातेचा आशीर्वाद पाठीशी असलेल्या मा.देवेंद्रभाऊ यांना भीती कसली?
त्या वेळचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री मा.देवेंद्रभाऊ लातूर-निलंगा दौऱ्यावर होते पूर्वनियोजित कार्यक्रम आटपून,त्यांचं हेलिकॉप्टर आकाशाकडे झेपावत होत पंख्याच्या जोरदार वाऱ्याने जमिनीवरील मातीचा धूर उडाला…आणि काही वेळातच, प्रसारमाध्यमांतून एक धक्कादायक बातमी समोर आली मुख्यमंत्री मा.देवेंद्रभाऊ ज्या हेलिकॉप्टरमध्ये होते, ते हेलिकॉप्टर हवेत झेपावतानाच अचानक गटांगळ्या खात खाली कोसळलं!
ते थेट जमिनीवर क्रॅश झालं. हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान झालं त्याचा स्पर्श लाइटच्या डिपीला झाला. पण…मा.देवेंद्रभाऊंना साध खरचटले सुध्दा झालं नाही! कारण त्यावेळी त्यांच्या जवळ होती एका किर्तनकाराने कार्यक्रमात दिलेली विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती! आजही ती मूर्ती त्यांच्या घरातील देव्हाऱ्यात श्रद्धेने विराजमान आहे प्रत्येक आषाढी एकादशीला देवाभाऊ संपूर्ण कुटुंबासह त्या विठ्ठल-रखुमाईची मनोभावे पूजा करतात..सांगायच तात्पर्य हेच आहे देवाभाऊच्या पाठिशी साक्षात नेहमी “देव” उभा आहे सर्वांना कल्पना आहे 2019 मध्ये स्पष्ट कौल जनादेश मिळवूनही मुख्यमंत्रीपद गेल तरीही हा माणूस खचला नाही विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी स्वीकारून तत्कालीन महाविकास आघाडीला राज्यात जनहितार्थ निर्णय घ्यावे म्हणून अक्षरक्ष कोरोनाच्या भयंकर स्टेज मध्ये राज्यभर दौरे करून तसेच प्रत्यक्ष सभागृहात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरून सळोकी पळो करून सोड करून सोडले होते… कालांतराने काही राजकीय तडजोडीमुळे मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री पद हसत मनाने स्वीकारले भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता व पक्ष आदेश म्हणून “मि पुन्हा येईल” या वाक्याची अनेकांनी टेहाळणी केली परंतु तो पांडुरंगाच्या आशिर्वादाने “पुन्हा आला”
-संतोष जाधव
भाजप सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्य






