गेवराई दि. 15 : वार्ताहर : गेवराई तालुक्याचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायतीची प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत प्रक्रिया
मंगळवार ता. 15 रोजी सकाळी 12 वाजता पारदर्शक पणे पार पडलीअसून, गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक तरूण पुढाऱ्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे, 139 ग्रामपंचायतीच्या सोडतीचे चित्र पाहता, कही खुशी कही गम,असे वातावरण पहायला मिळाले. दरम्यान, गेवराई तालुक्यातील 17 ग्रामपंचायती अनुसूचित जाती[ एस.सी ] , अनुसूचित जमाती साठी 2 [ एसटी ], नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 37 आणि उर्वरित जागा सर्वसाधारण स्त्री-पुरूष गटासाठी सोडण्यात आल्या आहेत. अशी माहिती तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली असून, आरक्षण सोडतीसाठी लहान मुलांचा सहभाग घेवून, सर्व प्रक्रिया पारदर्शक पणे पूर्ण केल्याचे ही त्यांनी सांगितले.मंगळवार ता. 15 रोजी सकाळी 12 वाजता
गेवराई तहसील कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणुक विभागात तहसील संदीप खोमणे यांच्या उपस्थितीत 139 ग्रामपंचायतीचे आरक्षण प्रवर्ग निहाय
जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार गेवराई तालुक्यातील 17 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आल्या असून, त्यामध्ये अनुसूचित जाती साठी
बोरीपिंपळगाव, राजपिंपरी, कांबी मजरा, औरंगपुर कुकडा, चकलांबा, सेलू, शहाजणपूर चकला, भोगलगांव तर अनुसूचित जाती स्त्री गटाला गुळज, मालेगाव बु., महांडुळा, रसुलाबाद, राजापूर, सैदापुर/जोडवाडी, किनगाव, रुई, पोईतांडा ग्रामपंचायतचा समावेश असून
अनुसूचित जमाती
कोळगाव ग्रामपंचायत
अनुसूचित जमाती स्त्री गटासाठी
सुशी वडगाव या दोन ग्रामपंचायती आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी
वसंतनगर तांडा, गैबीनगरतांडा, रेवकी, देवपिंपरी, गायकवाड जळगांव, भडंगवाडी, मिरकाळा, दैठण, सिरसदेवी, टाकळगव्हाण तरफ, बाबुलतारा, बोरगाव बु., कुंभे जळगांव, सुशी, तांदळा, सिंदखेड, टाकळगव्हाण तरफ तालखेड, नागझरी
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री गटासाठी जयरामनाईकतांडा, आहेर वाहेगांव, गंगावाडी (राहेरी), दिमाखवाडी, मनुबाई जवळा, पाडळसिंगी, वाहेगांव आमला, उक्कडपींपरी, वंजारवाडी, पाथरवाला बुद्रुक, राहेरी, गोंदी खुर्द, सुर्डी बु., आगर नांदूर, पांढरी, उमापुर, खांडवी, संगम जळगांव, डोईफोडवाडी
सर्वसाधारण गटासाठी अर्धपिंपरी, हिवरवाडी,चोरपुरी,शेकटा, भाट अंतरवली, मालेगांव खु., सुरळेगांव, धोंडराई, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, गौंडगावं, भोजगांव, माटेगांव, खळेगांव, कोल्हेर, लुखामसला, कटचिंचोली, हिंगणगांव, वडगांव ढोक, तलवाडा, अंतरवली बु., गोंविदवाडी, रामपुरी, ठाकर आडगांव, ताकडगांव, तळेवाडी, रांजणी, अर्धमसला, भेंड बु., एरंडगांव, पिंपळगांव कानडा, तळवट बोरगांव, खेर्डावाडी, जव्हारवाडी, मानमोडी, पोखरी, सिरसमार्ग, धारवंटा, मादळमोही, बंगालीपिंपळा, रोहितळ
सर्वसाधारण स्त्री गटासाठी
महारटाकळी, बालानाईकतांडा, पौळाचीवाडी, गुंतेगांव, तळणेवाडी, पांढरवाडी, खामगांव, सावळेश्वर, काठोडा, मिरगांव, बोरगांवथडी, चव्हाणवाडी, जातेगांव, चोपडयाचीवाडी, केकतपांगरी, मुधापुरी, रानमळा, धानोरा, भेंडटाकळी, भेंड खु., आम्ला, नांदलगांव, कुंभारवाडी, इंटकर, काजळा, टाकळगाव, मुळुकवाडी, गढी, बागपिपळंगाव, धुमेगाव, मारफळा, खेर्डा बु., सिंदफना चिंचोली, गोपत पिंपळगांव, पाचेगाव, गोळेगांव, ढालेगाव, सावरगांव पोखरी, मन्यारवाडी, हिरापूर, निपाणी जवळका, बेलगांव या गावांचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतीवर गाव पातळीवर काम करणाऱ्या गाव पुढाऱ्यांचा डोळा होता. मात्र, मोठी लोकसंख्या असलेली गावे नेमकी आरक्षणात गेली आहेत. त्यामुळे, मनात राजकीय गणित मांडून तयारी करणाऱ्यांचे स्वप्न पाण्यात गेले आहे. काहीजण, तहसील कार्यालयात तळ ठोकून होते. मनाविरुद्ध आरक्षण जाहीर होताच, अनेकांनी काढता पाय घेतला.दरम्यान, गेवराई तालुक्यातील 139 ग्रामपंचायतीचे प्रवर्ग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर, अनेकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसून आले. सर्व प्रक्रिया पारदर्शक पणे शांततेत पार पडल्याचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी सांगितले आहे.






