गेवराई – बीड : गावातील देवस्थानाला सोडलेल्या गायी नेहमीच आपल्या शेतात येऊन, पिकांचे नुकसान करतात; या रागातून गावातील पाच लोकांनी संगनमताने गायीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून गायींना गंभीर दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार बोरगाव ता. गेवराई जि.बीड येथे घडला असून, गायीवर झालेल्या हल्ल्यात एका गायीचा तडफडून मृत्यू झाला आहे. संबंधित सर्व लोकांविरोधात चकलांबा ता. गेवराई जि.बीड येथील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यात आली. मात्र, पोलीसांनी तक्रारीकडे कानाडोळा केला आहे. ज्यांनी गायींना कोंडून मारले, त्या लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी तक्रार कृष्णा बबलू
पिंपळे [ रा. नवे बोरगाव ता. गेवराई ] यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात केली आहे. चकलांबा पोलीस कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
कृष्णा बबलु पिंपळे [ रा. बोरगाव नवे, ता. गेवराई ] यांनी 18 जूलै 2025 रोजी चकलांबा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, मी स्वतः गैबिसाहेब पीर देवस्थानला सात वर्षापुर्वी गाय सोडली होती. दि.10 जूलै
3025 रोजी रात्री 1 च्या दरम्यान गावातील लोक झोपी गेल्यावर पात ते सहा लोकांनी गावाच्या पूर्व दिशेला विनोद कल्याण जाधव यांच्या तारीच्या वॉल कम्पाऊंड मध्ये ४-५ गायी हाकलून नेल्या. त्या गायींना कम्पाऊंड मध्ये घातले व कोंडले त्यानंतर , त्यांनी निर्दयी पणे कुन्हाड व तलावारीने गायींना मारण्यास सुरुवात केली. त्यातील दोन- तीन गायी कम्पाऊंड वरून उड्या मारून पळाल्या. काही गायी गंभीर जखमी झाल्या असून, त्यात एका गायीचा तडफडून मृत्यू झाला आहे.
पळून गेलेल्या गायींच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराचे वार असून त्यांनाही जिवेच मारण्याचा प्रयत्न केलेला आहे सदरची घटना ही खरी आहे. त्याचे पुरावे आहेत. गायीची हत्या करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली असून, अर्जदाराने राजु राघु सोनवणे, कृष्णा उर्फ शाकल बापू डुकरे, राम बापु डुकरे रंजना राजु सोनवणे, बाली कृष्णा उर्फ शाकल डुकरे सर्व रा. बोरगाव नवे, ता. गेवराई, जि.बीड यांच्यावर, गायींवर हल्ला केल्याचा
आरोप करण्यात आला आहे. दरम्यान पोलीसांनी अद्याप या अर्जावर कोणताही निर्णय घेतला नाही. संबंधित लोकांची कोणतीच चौकशी केली नाही आणि कारवाई सुद्धा केली नाही. त्यामुळे, पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






