गेवराई – बीड : भारत
सरकारने लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारत रत्न देऊन मोठा सन्मान करावा,अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे
मराठवाडा संघटक विनोद भाऊ थोरात यांनी केली आहे. शोषीत, पिडीत, कष्टकरी कामगारांसाठी आपली झुंजार लेखणी झिजवली.
संयुक्त महाराष्ट्राच्या निमितीसाठी
जनजागृती करून अण्णा भाऊंनी सामाजीक क्रांतीचे रनशिंग फुंकुन लढा उभारला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखनीला साथ देत, जग प्रसिद्ध असलेली फकीरा कादंबरी अर्पन करून, त्यांच्या विचाराला नमन केले.
जग बदल घालुनी घाव मज सांगुन गेले भिमराव , असे सांगणारे अण्णाभाऊ साठे यांना 105 व्या जयंतीनिमित्ताने भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न देऊन ,त्यांचा सन्मान करावा, अशी मागनी लहुजी शक्ती सेनेच्या मराठवाडा संघटक विनोद भाऊ थोरात यानी केली आहे.






